भविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जी सी पाटील मुनघाटे महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अभिवादन पर कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी कार्यकारी प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण अध्यक्षस्थानी उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक ज्ञानेश बनसोड तसेच शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. संजय मुरकुटे प्रा टिकाराम धाकडे उपस्थित होते. याप्रसंगी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याकरता व देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता उपयोगात आणले.
त्यांनी विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून जगातील सर्वोत्कृष्ट भारतीय संविधानाची निर्मिती केली. देशातील जनहितास प्राथमिकता देऊन कार्य केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर कायदे तज्ञ महान अर्थशास्त्रज्ञ पत्रकार लेखक समाज शास्त्रज्ञ व विविध अंगी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. विषमता रुपी समाजामध्ये सामाजिक न्यायाचे प्रस्थापना झाली पाहिजे समता समानता न्याय बंधुता इत्यादी लोकशाही मुलाची प्रस्थापना झाली पाहिजे.
या उदात्त हेतूने सर्वोच्च संविधान देशांमध्ये त्यांनी अर्पण केले असामान्य परिस्थितीमध्ये विषमता रुपी उपस्थितीमध्ये त्यांनी त्यांच्या बुद्धीच्या व संघर्षाच्या बळावर परदेशी उच्च शिक्षण घेऊन सिम्बॉल ऑफ नॉलेज अशी ख्याती प्राप्त करून घेतली यांच्या कार्य व कर्तुत्वाचा ज्ञानाचा फायदा संपूर्ण विश्वास संपूर्ण विश्वाला होत आहे.
त्यांचे विचार सदैव विश्वाला मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरतील असे मत मार्गदर्शनातून प्रा ज्ञानेश बनसोड यांनी व्यक्त केले व गीत प्रस्तुत करून प्रा. ज्ञानेश बनसोड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर दूरदर्शी व्यक्तिमत्व होते. त्यांनी भारत देशासाठी व समाज ऊत्त्थांनासाठी मूलभूत स्वरूपाचे कार्य केले असे मत डॉ. पंकज चव्हाण यांनी व्यक्त केले. डॉ.मुरकुटे व प्राध्यापक धाकडे यांनी देखील याप्रसंगी आपले मत व विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. कैलास खोब्रागडे तर प्रास्ताविक प्रा वसंत आवारी व आभार प्राध्यापक भाविकदास करमनकर यांनी मानले याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. गोहने प्रा.तोंडरे प्रा. वाळके प्रा. रणदिवे प्रा. निवेदिता वटक वसंत चुदरी, भास्कर कायते गणेश लांबट हरीश गोहने, श्रीमती चंदेल, भास्कर वाढ नकर, बालाजी राजगडे व इतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.