बाबा आम्हाला क्षमा करूच नका…

बाबा आम्हाला क्षमा करूच नका…

          बाबासाहेब,आम्ही तुझी लेकरं कधीच तुझ्या रक्ताची होऊ शकलो नाही……

       फुटकळ स्वार्थासाठी नेत्यांपुढे आम्ही लोटांगण घालून तुझ्या क्रांतीला लाजवलं……

तू जाळून टाकलेली……

        “मनुस्मृती “

     अवघ्या 75 वर्षात पुन्हा उफाळून आली आमच्या…..

   नामर्दपणामुळे…

      जाळण्यात आले पुन्हा संविधान तूच लिहिलेल्या रक्ताच्या शाईने.

     पाऊल न वाजताच शिरकाव केला इथे पेशवाईने…..

       पुरून उरले स्वाभिमानी त्यांना इथे बोटावर मोजण्याइतके…….

       पण त्यांचाही इथे घात केला फितूरांच्या फितूरीने.

         तरी सुद्धा तो,लढतो,झगडतो,थकत नाही,थांबत नाही,मनुवाद्यांना पेलतही नाही…….

केवळ……..

आणि….,…

केवळ……..

तुझ्या आजच्या अकाली जाण्याच्या…….

प्रेरणेने.

      आज आमचा ऊर फाटतो तुझ्या स्मृतीच्या विलापाने……

परंतू ………

      झाले गेले विसरून जातो उद्याच्या काळोखी सूर्याच्या मनुस्मृतीने.

    म्हणून,बाबा आम्हाला लाज वाटते म्हणायची की,क्षमा करा आम्हाला……

या मुर्दाड मनाला……

    पण,बाबा तुम्ही आम्हाला क्षमा करूच नका….

क्षमा करूच नका……

क्षमा करूच नका…

कारण…

     तुम्ही दिलेला आमच्यासाठी शेवटचा संदेश नानकचंद यांनी आमच्यापर्यंत येऊ दिलाच नाही…….

      असे म्हणून कर्तव्यापासून पळ काढणारे तुझे आम्ही लेकरं…..

    अवघ्या 75 वर्षात पुन्हा मनुस्मृतीने फुक मारली, अन अलगद उडून गेली तुझी पाखरं……

परंतू…….

      याच विझलेल्या राखेतून जन्म घेईन एखादी चिणगारी…….

तेंव्हाच तू आम्हाला कदाचित क्षमा करशील….

क्षमा करशील….

क्षमा करशील……

परंतू……

तरीसुद्धा…..

निर्लज्जपणे पुन्हा क्षमा मागणारा एक गुन्हेगार…

      अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689..