दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्रीक्षेत्र आळंदी येथे श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीसंत लक्ष्मीनाथ महाराज पुण्यतिथी उत्सव संपन्न झाला.
परमपूज्य गु.मोहननाथमहाराज पैठणकर यांच्या शुभहस्ते संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज समाधी पूजन, श्रीसंत लक्ष्मीनाथ महाराज व श्रीसंत केसरीनाथ महाराज समाधीस विधीवत अभिषेक पूजन करण्यात आले.
यावेळी संस्कृती, परंपरा व पंचागाची परीपुर्ण माहिती असलेली “नाथपीठ” दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
श्री संत लक्ष्मीनाथ महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त ह.भ.प मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचे पुण्यतिथीचे कीर्तन सेवा संपन्न झाली.
महाराष्ट्रात विशेषत्वाने नाथ परंपरेचे महत्त्व आहे, त्याचे कारण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांना याच नाथ परंपरेचा अनुग्रह झाला पुढे लक्ष्मीनाथ महाराज यांना सुद्धा अनुग्रह व गुरुपरंपरा लाभली.
गेल्या सव्वादोनशेहून अधिक वर्षे या नाथ परंपरेचे प्रबोधनाचे व सेवेचे हे कार्य श्रीसंत विट्ठलनाथ महाराज, श्रीसंत गणेशनाथ महाराज, श्रीसंत गौतमनाथ महाराज व विद्यमान पीठाधीश श्रद्धेय परमपूज्य मोहननाथ महाराज यांचे तीर्थरुप श्रीसंत भानुदासनाथ महाराजांच्या रूपाने अखंड अविरत सुरू राहिले व आज परमपूज्य श्रीगुरुवर्य मोहननाथ महाराजांच्या शुभाशीर्वादाने, पावन सहवासाने या परंपरेच्या सेवा व विस्तारकार्याची मोठी नांदी होत आहे.
या पुण्यतिथी उत्सवाला संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजननाथजी, मोहननाथ महाराज पैठणकर, बाजीराव नाना चंदीले, उदबोध महाराज पैठणकर, नरहरी महाराज चौधरी, ज्ञानेश्वर महाराज मेश्राम तसेच अनेक मान्यवर, महाराज मंडळी व वारकरी भाविक या कार्यक्रमास उपस्थित होते.