नागपूर हिवाळी अधिवेशनात चिमुर क्रांती जिल्हा घोषित करावे.:- आ.केशवराव वरखडे व इतर.. — २०२३,हिवाळी अधिवेशन/लक्षवेधक…

    रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर:-

          नागपुर येथे होवू घातलेल्या २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात,’चिमुर क्रांती जिल्हा,घोषित करण्याचे निवेदन चिमूरचे उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांच्या मार्फत मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार,महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांना निवेदन देण्यात आले.

          चिमुर हे स्वातंत्र संग्राम सैनिकांची भुमी असुन,लोकसभा व विधानसभा क्षेत्र आहे.लगतच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असुन दगडी कोळसा व खनिज संपत्ती,वनसंपत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.

         तसेच रामदेगी, मुक्ताबाई, सात-बहिणी, हे पर्यटन स्थळ चिमूर तालुक्याचे वैभव आहे.याचबरोबर चिमुर-नेरी-भिसी येथे हेमाळपंथी मंदिराचा वारसा लाभलेला आहे आणि चंद्रपुर, नागपुर, भंडारा, गडचिरोल, गोंदिया, यवतमाळ या जिल्हाचे अंतर १०० कि.मी.च्या वर आहे.

           स्वातंत्र्य संग्राम चळवळीतील इतिहास बघता अनेक स्वातंत्र्य संग्राम सेनानींना काळ्या पाण्याची शिक्षा व फाशी झाली आणि अनेकांना तुरंगवास भोगावा लागला. 

           मागील ४० वर्षापासुन चिमुर जिल्हाची मागणी तेवत आहे. चिमुर जिल्हासाठी चिमुर लगतच नेरी,जांभुळघाट, मालेवाडा परिसरात जागा उपलब्ध आहे.

           यामुळे येत्या अधिवेशनात तात्काळ,”चिमुर जिल्हा घोषित करावा,अशा प्रकारची मागणी केशवराव वरखडे,ग्रंथमित्र सुभाष शेषकर,डॉ.संजय पिठाडे,श्री.केमदेव वाटगुरे,नरेंद्र दांडेकर,रामभाऊ खडसिंगे,श्रिहरी सातपुते,सुरेश डांगे,कुणाल मैन,प्रविण गजभिये,किशोर जांभुळे,अनिल कडवे,सुरेश डफ,मिलींद जांभुळे आदिंनी निवेदनाद्वारे केली आहे.