प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान महाराष्ट्र राज्यातील साहित्यिक व कलावंतांनी आपल्या विविध प्रकारच्या मागण्या संबंधाने १२ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे मोर्चा काढला होता.
या मोर्चाचे निवेदन स्वीकारताना वने,सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना.सुधीरभाऊ मुंगटीवार यांनी वृध्द कलावंतांच्या व साहित्यिकांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते की,वृध्द कलावंतांचे पेंडींग असलेले सर्व अर्ज निकाली काढून पात्र ठरविण्यात येतील व सर्व अर्जदार वृध्द कलावंतांना मानधन सुरू करण्यात येईल आणि मानधनात श्रेणी नुसार वाढ करण्यात येईल.
मात्र,सांस्कृतिक कार्य मंत्री ना.सुधीरभाऊ मुंगटीवार यांनी वृध्द कलावंतांच्या शिष्टमंडळाला दिलेले शब्द पाळले नाही आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे जमा असलेल्या अर्जांची शहानिशा सुध्दा त्यांनी केली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
शहरी व ग्रामीण भागातील साहित्यीक व कलावंतांच्या विविध मागण्यांकडे मागील एक वर्षापासून दुर्लक्ष करणारे ना.सुधीरभाऊ मुंगटीवार हे यावर्षीच्या अर्ज मंजूर काळात तरी लक्ष देतील काय? व राज्यातील सर्व जिल्ह्यात पेंडींग असलेले अर्ज व चालू वर्षात येणारे सर्व अर्ज निकाली काढण्यासाठी व मंजूर करण्यासाठी निधी उपलब्ध करून देतील काय? तद्वतच एका जिल्ह्यात केवळ १०० कलावंतांचे अर्ज पात्र करणारी अट स्थितील करतील काय?हा मुद्दा ज्वलंत आहे व तितकाच महत्त्वाचा आहे.
ना.सुधीरभाऊ मुंगटीवार हे बोललेल्या शब्दांतंर्गत वर्तनूक करणारे नितीवान व्यक्ती म्हणून नागरिकांना चितपरिचीत होते.मात्र अलिकडच्या काळात ते बऱ्याच नागरिकांच्या संवेदनशील मुद्दाकडे लक्ष देत नसल्याची त्यांच्याबद्दल जनमानसात चर्चा उमटू लागली आहे.तरीही लोकचर्चा ऐवजी त्यांच्या कर्तव्यातील आत्मविश्वासावर भरोसा ठेवणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य हे संत-महापुरुषांची आणि साहित्यिक-कलावंतांची भुमी म्हणून अख्खा जगात ओळखली जाते आहे.म्हणूनच साहित्यिक व कलावंतांना आधार देण्यासाठी संपूर्ण राज्यात मानधन योजना सन १९५४-५५ पासून संचालनालयामार्फत राबविली जाते आहे.
अ,ब,क श्रेणी अंतर्गत वृध्द कलावंतांचे व साहित्यिकांचे अर्ज मंजूर केली जातात.अ श्रेणी मध्ये मोडणाऱ्यांना ३ हजार १५० रुपये,ब श्रेणीतील कलाकारांना २ हजार ७०० रुपये तर क श्रेणी अंतर्गत येणाऱ्या कलावंतांना २ हजार २५० रुपये दरमहा मानधन दिले जाते व हे मानधन वर्षातून दोन दा कलावंतांच्या व साहित्यिकांच्या बँक खात्यावर जमा केली जातय.
वृध्द कलावंतांनी व साहित्यिकांनी दर वर्षाला ३१ जानेवारी पर्यंत अर्ज देणे बंधनकारक आहे.त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जात नाही.पात्र लाभार्थ्यांंची निवड,”इष्टांकानुसार,कलावंतांची निवड समिती मार्च महिन्यात साधारणतः करते.
असे असले तरी,केवळ १०० लाभार्थी पात्र अटी मुळे व पुरेसा निधी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांलयातंर्गत उपलब्ध होत नसल्यामुळे हजारो वृध्द कलावंतांचे व साहित्यिकांचे अर्ज जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात धुळखात पडलेले आहेत.
दर वर्षाला केवळ १०० कलावंतांच्या व साहित्यिकांच्या अर्जाला मंजुरी दिली जावी ही अट,”वने,सांस्कृतिक कार्य,मत्स्यव्यवसाय मंत्री ना.सुधीरभाऊ मुंगटीवार यांनी रद्द करणे आवश्यक आहे व अर्ज पात्रतेनुसार निधी पुरेसा उपलब्ध करून देणे तितकेच महत्त्वाचे आहे.
१२ डिसेंबर २०२२ ला, वृध्द कलावंतांच्या व साहित्यिकांच्या शिष्टमंडळाला नागपूर हिवाळी अधिवेशन काळात दिले गेलेले आश्वासन,एक वर्षाच्या प्रदिर्घ कालावधी नंतर ना.सुधीरभाऊ मुंगटीवार पाळतील काय? आणि आपल्या शब्दाला जागतील काय?
ते लवकरच कळेल...