दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
चिमूर तालुक्यातंर्गत भिसी नगर म्हटले की राजकीय शक्तीचे विचार पिठ व सामाजिक सांस्कृतिचे श्रध्दा स्थान.अप्पर तालुक्याचा व नगरपंचायतचा दर्जा असलेल्या अशा या भिसी शहरातील हजारो जेष्ठ नागरिकांनी,युवक बांधवांनी व जेष्ठ भगिनींनी आणि युवती असलेल्या ताईंनी कॅंडल मार्चद्वारा महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
भिसी शहरातील महत्त्वपूर्ण मार्गाने कॅंडल मार्च काढण्यात आला.बाजार चौक मंगळवारी पेढ येथून शनिवार पेठ येथे कॅंडल मार्च क्रमीत झाला.शनिवार पेठ येथे बौद्ध विहारात युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण केलीत व त्रिशरण पंचशीला ग्रहण केल्यानंतर सामुहिक रित्या महामानवास भावपूर्ण आदरांजली वाहिली.
यानंतर जुन्या भिसीकडे कॅंडल मार्चने मार्गक्रमण केले व तेथील बौद्ध विहारात महामानव-बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार,पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले व त्रिशरण पंचशीला ग्रहण केल्यानंतर सामुहिक रित्या बोधिसत्वास भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यानंतर कॅंडल मार्च हा मुख्य मार्गाने क्रमण करीत बाजारचौक येथील युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित झाला.
तिथे मुख्य कार्यक्रमांतर्गत विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनेक मान्यवरांनी व अनेक जेष्ठ पत्रकारांनी पुष्पगुच्छ,पुष्पचक्र,पुष्पहार अर्पण करून विनंम्रपणे अभिवादन केले.
यानंतर सामुहिक रित्या त्रिशरण पंचशीला ग्रहण करण्यात आली व लागलीच एकाग्र चित्ताने मनःपूर्वक श्रध्दांजली वाहण्यात आली.यानंतर मार्चची सांगता झाली.
मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रविंद्र गोंगले यांनी केले.
ढगाळमय वातावरणातंर्गत दिवसभर रिमझिम सुरू असलेल्या पाऊसाने काही वेळ विसावा घेत भिसी येथील हजारो नागरिकांसह भारतीय संविधान निर्माते,प्रकांड पंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्याबद्दल आपला आदरभाव व सन्मानभाव मनसोक्तपणे व्यक्त केला.