कन्या विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा…

  चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा

साकोली:- स्थानिक कलाबाई कन्या विद्यालय साकोली येथे आज दिनांक 6 डिसेंबर 2023 रोज बुधवारला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

            यावेळी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी बी चोले तर प्रमुख पाहुणे श्री राऊत मुख्याध्यापक आनंदाबाई प्राथमिक शाळा , हत्तीमारे ,झिंगरे , माटूरकर,खडके उपस्थित होते.

             भारतात प्राचीन काळापासून असलेली सामाजिक व्यवस्था कौशल्य पूर्वक बदलून भारतात आदर्श अशी सामाजिक क्रांती घडविण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असे मुख्याध्यापक श्री चोले यांनी प्रतिपादित केले . जगात अनेक राजकीय व सामाजिक क्रांती घडून आल्या मात्र दीर्घ व कोट्यावधी अनुयायी मिळवणारी व सफल अशी क्रांती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणली म्हणून ते ‘महामानव’ ठरतात.या शालेय विद्यार्थिनी खुशबू गोटेफोडे, लक्ष्मी शेंडे, स्नेहा कोटांगले,कावेरी बारसागडे, समीक्षा नान्हे,पूजा खडके यांनी यांनी गीत भाषण सादर केले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कापगते यांनी तर संचालन सौ नगरकर, आभार माटूरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व प्राध्यापक, शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमा करिता शिक्षकेत्तर कर्मचारी भुरे, उके यांनी प्रयत्न केले.