भाजप आध्यात्मिक आघाडीच्या शिरूर लोकसभा निवडणूक प्रमुखपदी संजय घुंडरे पाटील यांची निवड…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : भाजप निवडणुकीच्या कायम तयारीत असतं असं म्हटलं जातं. 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरु झाली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी ही निवडणुक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच आज लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या माध्यमातून सर्व 48 लोकसभा मतदारसंघात निवडणुक प्रमुखांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

           भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी राज्यातील प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. त्यात प्रामुख्याने शिरूर लोकसभेची जबाबदारी आळंदीचे हभप संजय महाराज घुंडरे पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पुणे लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून हभप भाऊ महाराज फुरसुंगीकर यांची निवड करण्यात आली आहे.

        पवारांच्या बारामतीत बाबासो खारतोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघात संजय घुंडरे पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.