नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली-नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,संविधानाचे जनक ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन निमित्त स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य के एस डोये सर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. के.जी.लोथे सर एम.टी.कोचे सर, आर.बी. कापगते मॅडम व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी एम.टी.कोचे सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करताना म्हणाले, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्रासन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, माणसाचे विचार समृद्ध होतात, इतरांप्रती आधार ,विनयभाव, क्षमाभाव हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची अत्यंत गरज आहे असे महान कार्य बहुजनांना शिक्षण घेण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.त्यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलितांच्या श्रमिकांच्या जीवनातील अंधकार दूर करून त्यांना प्रकाश झोतात आणण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, असे मौलिक विचार के एस डोये यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.
शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सहकार्य केले.