नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) साकोली येथे महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्राचार्य मुजम्मिल सय्यद, पर्यवेक्षिका शर्मिला कछवाह, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, विनोद किरपान व सतिश गोटेफोडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष मुजम्मिल सय्यद यांनी विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनचरित्राविषयी माहिती सांगून आपल्या भारताला संविधान करणाऱ्या महामानवाचा आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे गुण अंगिकारून देशाच्या विकासासाठी व भवितव्यासाठी प्रयत्नशिल बनावे असे आव्हान केले. रोझी पठान यांनी ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा बाबासाहेबांचा मुलमंत्र विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन रोझी पठान व आभार चंद्रकांत भावे सर यांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News