वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे
वाशिम :- अनुभव शिक्षा केंद्र वाशिम अंतर्गत दि.०५/१२/२०२२ रोजी धाबेकर महाविद्यालय कारंजा येथे महाविद्यालय येथील युवकांसोबत उद्बोधन कार्यक्रम घेण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये *सामाजिक न्याय,प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्व,पर्यावरण धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही,स्त्री पुरुष समानता,श्रम प्रतिष्ठा* या मूल्याबाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.युवकांचा महाविद्यालय येथे अनुभव कट्टा सुरू करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शक म्हणून अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक मा.आशिष धोंगडे उपस्थित होत.या उद्बोधन कार्यक्रमांमध्ये महाविद्यालय येथील मा.प्रा.गवई (प्राचार्य) आणि तसेच महाविद्यालय येथील शिक्षक वृंद आणि मोठ्या प्रमाणामध्ये युवक व युवती उपस्थित होते अशा प्रकारे हा उद्बोधन कार्यक्रम महाविद्यालय येथे संपन्न झाला..
आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्यूज भारत