महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पडला प्रोटोकॉलचा विसर,नेत्यांचे फोटो कार्यकर्त्यांच्या बरोबरीत…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक

               राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. वेगवेगळ्या पक्षांनी, उमेदवारांनी राज्यभर जोरदार प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, सोमवारी बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे प्रयत्न चालू होते. त्यात सर्वच पक्षांना काही प्रमाणात यश मिळालं आहे. तर, काही बंडखोऱांची समजूत काढण्यात नेते अपयशी ठरले आहेत. आता पुढचे काही दिवस प्रचाराचे असून आतापासूनच दर्यापूर विधानसभा मतदारसंघात नाराजीचा सूर पहावयास मिळत आहे.

             दर्यापूर विधानसभेच्या निवडणूक प्रचारला सुद्धा सुरवात झाली आहे. दर्यापूर येथील महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गजानन लवटे यांना रिपाई गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांचा फोटो कार्यकर्त्याच्या लाईनमध्ये लावला आहे.

             दर्यापूर येथे महाविकास आघाडीचे अधिकृत कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आहे.या फलकावरती रिपाईचे सरचिटणीस राजेंद्र गवई यांचा फोटो अमरावती काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्या बरोबरीत लावला असून दर्यापूर येथील रिपाईचे कार्यकर्ते यांनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे. आमच्या नेत्याचा फोटो जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते यांच्या बरोबरीत टाकल्यामुळे दर्यापूर तालुक्यातील संपूर्ण रिपाईचे कार्यकर्ते महाविकास आघाडी यांच्या विरोधात आक्रमक भुमिकेच्या तयारीत दिसत आहे.

प्रतिक्रिया 

         डॉ.राजेंद्र गवई हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई गट) राष्ट्रीय सचिव आहेत. डॉ राजेंद्र गवई यांना मानणारा वर्ग हा दर्यापूर तालुक्यात मोठया प्रमाणात आहे.त्यांचा फोटो हा कार्यकर्त्यांच्या बरोबर टाकणे हा रिपाईचा(गवई गट)अपमान आहे. हा अपमान सहन केल्या जाणार नाही. 

 अनिल गवई

दर्यापूर तालुकाध्यक्ष 

   रिपाई (गवई गट)