विविध संत-महापुरुषांसह आराध्य तिर्थक्षेत्र,”मुक्ताई येथे,”माॅ मनका देवीला,त्रिवार वंदन करून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केलाय प्रचाराचा शुभारंभ!.

 

दामोधर रामटेके 

 कार्यकारी संपादक 

        चिमूर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरविंद सांदेकर यांनी,”माना समाजाचे आराध्य दैवत असलेल्या डोमा परिसरातंर्गत तिर्थक्षेत्र असलेल्या “मुक्ताई येथील माॅ मानका देवीला,त्रिवार वंदन करीत प्रचाराचा नारळ फोडलाय.

        याचबरोबर डोमा इथे जाऊन तथागत भगवान बुद्ध,परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर,वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,वंदनीय राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पन करून अभिवादन केले आणि चिमूर विधानसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली.

       त्यानंतर वंचितची प्रचार रॅली शंकरपुरला आली.तिथे बस स्टॉप जवळील परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अरविंद सांदेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

           या वेळी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अरविंद सांदेकर यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष शुभम मंडपे,जिल्हा उपाध्यक्ष स्नेहदिप खोब्रागडे,आश्विन मेश्राम,जिल्हा सल्लागार ज्ञानेशवर नागदेवते,नारायण कांबळे,जिल्हा सचिव राजू अलोने,धर्मवीर गराडकर तसेच चिमूर तालुका अध्यक्ष बनसोड प्रामुख्याने उपस्थित होते.

       या प्रसंगी चिमूर,नागभिड व ब्रम्हपुरी तालुक्यातील तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

             वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरविंद सांदेकर यांच्यासह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्तागण जोमाने प्रचार करण्यासाठी तयारीला लागले असून प्रस्थापित पक्षांना त्यांनी धक्का द्यायचे ठरविले आहे.