लोकशाही केवळ निवडणुकीपुरतीच नसते……
तर ती आमच्या व भावी पिढीच्या कायम उन्नतीसाठीची प्रक्रिया असते….
जगाच्या पोशिंद्यानो…
राजकीय सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारी धोरणामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या झालेल्या कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसदारांनो आणि त्या आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्यानो लक्षात ठेवा..
“तुमच्यावर जी वेळ आलेली आहे..
त्या सुडाचा बदला घेण्याची हीच संधी आहे,जी केवळ पाच वर्षातून एकदाच तुम्हाला मिळते….
तुमचा बाप,तुमचा भाऊ,तुमचे आजोबा,तुमचे मामा,तुमचे काका त्यांनी कोणता गुन्हा केला होता की ज्यामुळे त्यांच्यावर गळ्याला फास लावण्याची,अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेण्याची वेळ आली?
अहो रात्रंदिवस शेतात, दुसऱ्याच्या शेतात विजेच्या तालावर राबायचं…
मुलाच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी, दवाखान्याचे बील भरण्यासाठी,नातेवाईकांच्या सुख दुःखात सहभागी होण्यासाठी,मुलामुलीच्या नोकरीसाठी,पत्नीच्या आजारपणासाठी,स्वाभिमानाने जगण्यासाठी,दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करुन कधी वेळेला पोटभर जेवण नाही,शिळं पाकं असलेलं खाऊन अणवानी राब राब राबायचं…..
जगता जगता मरणाऱ्या आणि मरता मरता जगणाऱ्या दयनीय अवस्थेतून जिवंत राहण्याचा मार्ग शोधायचा, अशाही धडपडीतून केवळ उद्याच्या भाबड्या आशेवर उद्याच्या दिवसाची वाट पाहत रात्र काढायची….
आणि उद्याचाही दिवस तसाच निघावा आणि पुन्हा रात्री निराशाच पदरी पडावी,पुन्हा उद्याची तीच भाबडी आशा…….
हे किती दिवस सहन करायचं? सहनशीलता ज्या दिवशी संपते त्या दिवशी इहलोक सोडून जातो……..
का स्वाभिमानाने जगणे,कुटुंबासाठी जगणे,नातेवाईकांसाठी जगणे,त्यांच्यावर येणाऱ्या संकटाचा सामना करणे गुन्हा आहे!….
अहो तुमच्या जगता – जगता मरणाऱ्या व मरता – मरता जगणाऱ्या धडपडीतून ही निर्लज्ज,नालायक,बेलगाम,नितिभ्रष्ट सत्ताधारी राजकीय नेते मंडळी……
काय ते झाडी….? काय ते डोंगर,….? काय ते हॉटेल…..? कितीतरी स्टारच्या हॉटेलच्या खिडकीमधून आकाशात तुमच्या आत्महत्या केलेल्या बापाला, मामाला,काकाला,आजोबाला, वाकुल्या दाखवत असतील!..
राज्यातील आणि देशातील तसेच जगातील सर्व जनता झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे कांही तोंडातून पोटात टाकते, त्या सर्व पदार्थाचे बेसिक रॉ मटेरियल कोणत्याही कारखान्यात न बनता ते केवळ तुम्हीच शेतात राबल्यामुळे मिळते.
याची जाणीव सुद्धा या गेंड्याच्या कातडीवाल्या सत्ताधाऱ्यांना नसते!
परंतू,तुम्ही मात्र या अन्यायाला स्वतःच्या,पूर्वजन्मीच्या पापामुळे असं नशीब समजून या राजकारण्यांना अलगद क्लीन चीट देता…..
म्हणून,यांची मिजास वाढून तुमच्या मड्यावरचे लोणी खाण्यासाठी नेहमी टपून बसलेली असते.
राजकीय स्वार्थासाठी ही राजकीय नेतेमंडळी स्वतःच्या बापाचेही नरडे आवळायला कमी करणारी नाही अशी ही औलाद आहे..
यांना ना तुमचे घेणे देणे, यांना ना तुमच्या आत्महत्या केलेल्या नातेवाईकांचे घेणे देणे,यांना ना राज्यावर झालेल्या कर्जाचे घेणे देणे,यांना ना जनतेचे घेणे देणे,ना यांना देशाचे व संविधानाचे घेणे देणे,यांना केवळ तुमच्या जागृत न होणाऱ्या झोपेमुळे केलेल्या भ्रष्टाचारातून मिळविलेल्या संपतीला सुरक्षित ठेवण्यासाठी मोदी – शहाचे तळवे चाटण्यातच धन्य मानणारी ही निर्लज मंडळी आहे!
अशांना वेळीच रोखायचे असेल,या प्रवृतीला वेळीच लगाम घालायचा असेल, आपल्या आत्महत्या केलेल्या बापाला,भावाला खरोखर श्रद्धांजली अर्पण करायची असेल,तर जागृत होऊन मताच्या अधिकाराचा वापर करा…
यांच्या कोणत्याही भुलथापाला बळी न पडता, लाडक्या बहिणीच्या योजनेला बळी न पडता,कोणत्याही धमकीला न घाबरता मताचा अधिकार गाजवा…
कारण तुमच्या हातातील या मताच्या अधिकारात एवढी शक्ती आहे,की या नितिभ्रष्ट व्यवस्थेचा कडेलोट होऊन जाईल….
जर कदाचित कडेलोट झालाच तर आपण सर्वजण मिळून या EVM ला कायमचे गाडून टाकून आपल्या मताचा अधिकार कायमचा सुरक्षित ठेऊ….
परंतू ,तोपर्यंत आहे त्या परिस्थितीत सुद्धा या व्यवस्थेला शेवटचे पाणि पाजण्याची तयारी ठेऊनच येत्या 20 तारखेला त्यांची जागा दाखवून देऊ…..
गेल्या 5 वर्षातील मरगळ झटकून टाकून नवा पुरोगामी महाराष्ट्र घडवा……
हे संविधान आम्ही भारताचे लोक यांच्यासाठी आहे.आणि स्वतःप्रत अधिनियमित करुन अंगीकृत करण्यासाठी आहे….
तेंव्हा ही जबाबदारी माझीच आहे आणि मीच याला जबाबदार आहे.म्हणूनच मला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मला गुप्त मतदानाचा अधिकार जो माझ्या जिवापेक्षाही मोलाचा आहे.तो मला प्रदान केलेला आहे….
तेंव्हा हा मताचा अधिकार मी जबाबदारीने माझ्या देशासाठी,माझ्या लोकशाहीसाठी,माझ्या संविधानासाठी,एवढेच नव्हे तर येणाऱ्या माझ्याच भावी पिढीच्या कायम उन्नतीसाठी पार पाडीन. (हा निर्णय प्रत्येकाने घ्यावा) …..
मताचा अधिकार ही एक भावी आणि आजची आमची सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य समजून पार पाडावे…..
*****
विनंती :- प्रत्येकांनी आजपासून 20 नोव्हेंबर पर्यंत येणाऱ्या मतदान जागृतीच्या सर्व पोस्ट दररोज आपल्या मोबाईल मधील जेवढे व्हाट्सअप गृप आणि मो. नं.असतील त्यावर अपलोड करुन व्हायरल कराव्यात….
*****
जागृतीचा लेखक आणि आवाहनकर्ता..
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689..