तेलंगना विधानसभा कांग्रेस निरिक्षक म्हणुन डॉ. अविनाश वारजुकरांना दिली जबाबदारी….

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी

चिमूर:-

        अखिल भारतीय कॉंग्रेस कमीटीचे तेलंगना राज्य प्रभारी मानिकराव ठाकरे यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा खनिकर्म महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश वारजुकर यांचेकडे तेलंगना राज्यातील मधीरा विधानसभा क्षेत्राचे निरिक्षक म्हणुन जबाबदारी दिली आहे.

          अखिल भारतीय कॉंग्रेस कमीटीचे तेलंगना राज्य प्रभारी मानिकराव ठाकरे यांनी तेलंगना राज्यातील खम्मम लोकसभा क्षेत्रातील ७ विधानसभा क्षेत्रात निरिक्षक म्हणुन विविध कॉंग्रेस नेत्यांचा निरिक्षक म्हणुन नियुक्ती करण्यात आली असुन यात मधीरा विधानसभा क्षेत्राचे निरिक्षक म्हणुन डॉ.अविनाश वारजुकर यांची नियुक्ती केली आहे.

          या नियुक्तीपत्रात पलैर विधानसभा क्षेत्राचे निरिक्षक म्हणुन विनायक देशमुख, मधीरा विधानसभा क्षेत्राकरीता निरिक्षक म्हणुन डॉ.अविनाश वारजुकर, व्यारा विधानसभा क्षेत्र निरिक्षक शाम उमळकर, सातुपल्ली विधानसभा प्रदिप राव,कोटगुड्डम विधानसभा क्षेत्र निरिक्षक मनोज शिंदे, खन्नम विधानसभा क्षेत्र शकुर नागाणी,अस्वरावपेठ विधानसभा क्षेत्राकरीता तौफिक मुलानी यांची निवड केली आहे.