दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : भाजपा आळंदी शहराची कार्यकारिणी जाहीर झालेली असून आता शहराच्या अंतर्गत विविध आघाड्यांच्या अध्यक्ष निवड घोषित करण्यात आली. त्यात ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी भागवत काटकर यांची निवड शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी केली.
नुकत्याच झालेल्या शहर कार्यकारणीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. यावेळी संजय घुंडरे, सचिन गिलबिले, सागर भोसले, पांडुरंग वहीले, संदीप सावंत, गणेश गरुड, भागवत आवटे, संगिता फपाळ, बंडुनाना काळे, चारुदत्त प्रसादे, विकास पाचुंदे, आकाश जोशी, ज्ञानेश्वर बनसोडे, आनंद वडगावकर, सचिन सोळंकर, प्रमोद बाफना, वासुदेव तुर्की तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भागवत काटकर हे उच्च शिक्षित असून अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते तसेच संघटन सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच ते नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष असून ते आळंदी नगरपरिषद वृक्ष प्राधिकरण सदस्य सुद्धा होते.
भाजपा ओबीसी मोर्चाचे संघटन वाढवाणे तसेच ओबीसींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना भाजपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ओबीसी मोर्चाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष भागवत काटकर यांनी सांगितले.