कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :-
पारशिवनी तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडल्या.
तहसील मधील ग्रामपंचायत क्षेत्रात २१ हजार ४२२ मतदारांपैकी १८ हजार ४२९ (८६.०३%) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.यामध्ये १० हजार २२० पैकी ८ हजार ६५७ (८४.७१%) महिलांनी मतदानात सहभाग घेतला तर ११ हजार २०२ मतदारां पैकी ९ हजार ७१२ मतदार (८७.२३%) पुरुष मतदारांनी मतदानात भाग घेतला.
झालेल्या मतदानात गरडा गवना ग्रा.पं.येथे सर्वाधिक ९७.०५ टक्के मतदारांनी सहभाग घेतला तर सर्वात कमी मतदान बच्छेरा ग्रामपंचायतीत ५८ टक्के झाले.
निवडणुकीसाठी तहसील परिसरात ५१ मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती व त्यासाठी ४०५ निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ९० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पारशिवनी तहसील कार्यालयात आज सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.