बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील लक्ष्मी नरसिंह देवस्थानच्या चरणी नतमस्तक होऊन दत्तात्रय भरणे यांनी दर्शन घेतले. यावेळी मंदिर विकास कामाची केली पहाणी.
या प्रसंगी दत्तात्रय भरणे बोलत असताना म्हणाले की लक्ष्मी नरसिंहाचा आशीर्वाद व मतदान रुपाने तालुक्याने दिलेला विश्वास याचा कधीच विसर पडू देणार नाही. देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थांनी मंदिराच्या कामावर लक्ष ठेवून दर्जेदार काम करून घ्यावे कामासाठी निधीची कमतरता झाली तरी निधी उपलब्ध करून दिली जाईल. देवस्थानच्या झालेल्या कामावर मी समाधानी आहे. माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे यावेळी उदगार…
श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त आले आसता माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल्याच्या महाप्रसादासाठी दोन लाख रुपये अगोदर जमा केले होते.
तर गुरुवर्य बापूसाहेब देहुकर यांना आडीच तोळे सोन्याची चैंन, शाल, श्रीफळ, पगडी,व सन्मान पत्र देऊन सत्कार केला.
लक्ष्मी नरसिंह मंदिराचे चालू आसलेल्या कामाची पाहणी केली.मंदिरच्या पाहणी प्रसंगी माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, माजी सरपंच श्रीकांत बोडके, सचिन सपकाळ, विद्यमान सरपंच आर्चना सरवदे, सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे,सरपंच सुदर्शन बोडके, उपसरपंच संतोष सुतार, उद्योजक आरुण क्षीरसागर, माजी सरपंच सोमनाथ मोहिते, ग्रामपंचायत सदस्य दशरथ राऊत , महेश शिरसागर, देवस्थान कमिटी मुख्य विश्वस्ता सहित सर्वच भाविक उपस्थित होते.