समर्थ महाविद्यालयं लाखनी येथे सतर्कता व जागरुकता सप्ताह 2023 कार्यक्रम संपन्न…

 

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

             राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी अंतर्गत समर्थ महाविद्यालय, लाखनी व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लाखनी व गडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सतर्कता व जागरूकता 2013 अंतर्गत दिनांक 3 नोव्हेंबर 2023 भ्रष्टाचार मुक्त भारत या विषयावर चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले.

           यामध्ये एकूण 21 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. चित्रकला स्पर्धेत तृप्ती पारधी या विद्यार्थ्यांनीला प्रथम क्रमांक तर धनश्री पत्रेला द्वितीय क्रमांक आलेला आहे. तसेच विशाखा भुसारी व विनय रोकडे हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. निबंध स्पर्धेत ट्विंकल चानोरे ही प्रथम प्रणाली वंजारी द्वितीय तर भाग्यश्री नंदेश्वर या विद्यार्थिनीचा तृतीय क्रमांक आलेला आहे या कार्यक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लाखनी ची व्यवस्थापक व्यवस्थापक श्री धनराज खवास यांनी सतर्कता या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले.

             तसेच गडेगाव शाखेचे व्यवस्थापक हेमंत मिरगुलवार यांनी डेबिट आणि क्रेडिट या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले तसेच लाखनी पोलीस स्टेशनचे अधिकारी राजू बडवाईक यांनी विद्यार्थ्यांनी सतर्क कसा राहिले पाहिजे यावर आपले मार्गदर्शन केले. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

              या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कापसे यांनी विद्यार्थ्यांना सतर्कता बाळगण्याचा संदेश दिला. तसेच आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचे असेल आणि आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर शैक्षणिक कर्ज घेऊन आपले उच्च शिक्षण पूर्ण करू करावे असे त्यांनी सांगितले.

             या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी अमरदीप व इतर कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अजिंक्य भांडारकर, प्रा. डॉ. पर्वते, प्रा. शितल कोमेजवार, प्रा.पूजा नवखरे, प्रा. कीर्ती शेंडे, प्रा. प्रेरणा चाचेरे, प्रा. मोहन फुंडे, शिक्षेकेतर कर्मचारी मंगेश शिवरकर, श्याम पंचवटे, दिनेश सलामे, प्रणय रोकडे, दुर्गा वंजारी यांची उपस्थिती होती.

            या कार्यक्रमाचे संचालन प्रा. कुमारी मनीषा मदनकर यांनी केले तर आभार प्रा. जयश्री निर्वाण यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.