नरसिंहपुर ते पिंपरी बुद्रुक परीसरात नवरात्र उत्सवला प्रारंभ,तर आराधी मंडळाच्या महिला भगिनींचा देवीच्या गाण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

         सालाबाद प्रमाणे चालू वर्षी नवरात्र उत्सवाच्या चैथी दिवसाला प्रारंभ झाला. यामध्ये अनेक महिला भगिनींचा देवीच्या गाण्यासाठी चांगलाच प्रतिसाद मिळाला.

          पिंपरी बुद्रुक आणि पंचक्रोशीतील सर्वच महिला भगिनी व ग्रामस्थ देवीच्या दर्शनाला व गाण्याचा आनंद घेण्यासाठी शेकडो भाविकची गर्दी होत आहे. 

         पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील आराधी मंडळ महिला भगिनी आई भवानी माता मंदीरात देवीच्या गाण्यासाठी दररोज बहुसंख्येने आपली हजेरी लावीत आहेत.

           दररोज सकाळी महा आरती होत आहे आणि संध्याकाळच्या आरतीनंतर देवीच्या मंदिरात आराधी मंडळाच्या गाण्याचा जंगी सामना रंगत असून प्रत्येक भावीकाच्या नावाने देवीचा पावड म्हणण्यासाठी, वरदक्षिणा दिली जात असते. महिला भगिनी आनंदाने आई अंबाबाईच्या नावाने जयघोष करून देवीची गाणी मनोभावाने गायली जात आहेत ग्रामस्थ व भाविकाची ‍ गाण्याच्या कार्यक्रमाला चांगलीच उपस्थित आसते.

चौकट 

           नरसिंहपुर, टणु, गिरवी आडोबा वस्ती, पिंपरी बुद्रुक, ओझरे, गणेशवाडी, सराटी,गोंदी,या सर्वच् ठिकाणी भवानी माता देवी व घटस्थापना मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह भ प महेश सुतार हे करीत आहेत.