
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
महाराष्ट्र शासनाने माहे सप्टेंबर मध्ये तिन प्रकारचे जनविरोधी व विद्यार्थी विरोधी निर्णय घेऊन,”त्यांच्या,महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य समाज विरोधातील कुरापती व षडयंत्र सरळसरळ उघडे पाडले.
बहुजन समाजासाठी अत्यंत घातक असलेल्या निर्णयाविरोधात संघर्ष करणे,लढा लढणे काळजी गरज आहे.
संघर्षाचा व लढ्याचा महत्वपुर्ण उदेश ध्येयनिष्ठ असल्याशिवाय त्या उदेशात यशस्वी होता येत नाही.
शासकीय सेवेत कंत्राटी भरतीचा जिआर रद्द करणे,राज्यातील ६२ हजार जिल्हा परिषद शाळा दत्तक देण्याचे धोरण रद्द करणे,२० च्या आत पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येवू नये यासाठी चिमूर तालुका कांग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते आज सातत्याच्या साखळी धरणे आंदोलनाला चिमूर तहसील कार्यालयासमोर सकाळी ठिक ११ वाजता प्रारंभ करणार आहेत.
बहुसंख्य समाज विरोधातील महाराष्ट्र शासनाचे तिन निर्णय लक्षात घेता,”ते तिन्ही निर्णय जो पर्यंत महाराष्ट्र शासन रद्द करीत नाही तोपर्यंत,चिमूर तालुका कांग्रेस पक्षाने सातत्याने साखळी आंदोलन करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय महत्वपूर्ण व संवेदनशील असाच आहे.