सावली (सुधाकर दुधे)
आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महाकारूनीक तथागत गौतम बुद्ध,विश्वरत्न परमपूज्य,घटनेचे शिल्पकार,कायदेपंडीत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पूजन करून मानवंदना देऊन स्मरण्यात आले.पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण मान.के.एन.बोरकर साहेब अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीती शिक्षण प्रसारक संस्था सावली यांचे हस्ते करुन पंचशिल ध्वजाला सलामी देण्यात आली. तद्नंतर महाविद्यालयाचे कनिष्ठ अधिव्याख्याता व्हि.के गायकवाड यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करित असतांनाच मात्र आमच्या याच देशात दुसरीकडे केवळ दलीत विद्यार्थ्यांनी माठातलं पाणी पीले त्यामुळे मुख्याध्यापकासारख्या जबाबदार व्यक्तीकडून बेदम मारहाण करून त्याला जीवानीशी संपवलं,केवळ खालच्या जातीतील व्यक्ती म्हणून, घोड्यावरून वरात काढायला मनाई केली जाते हाच काय आपला पुरोगामी विचारांचा देश? मी हिंदू म्हणून जन्मलो हे माझ्या हातात नव्हतं,पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या येवले येथे घोषणा करून येथील मनुवादी विचारसरणीला १९३५ साली तगडे आव्हान दिले आणि १४ आक्टोबर१९५६ ला सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर तथागत गौतम बुध्दाच्या विज्ञानाच्या कसोटीवर बसणाऱ्या शांती,अहिंसा, बंधूता,न्याय यावर आधारित असणाऱ्या बुध्द धम्म लाखोंच्या उपस्थितीत स्विकारुन दीक्षा दिली,तो हाच दिवस अशोका विजयादशमी,असा मोलाचा संदेश दिला.
अध्यक्ष स्थानावरुन बोलताना के.एन.बोरकर साहेब म्हणाले की, आपल्या देशात सुरवातीला मोघल सम्राटांचे राज्य होते त्यानंतर १५० वर्ष इंग्रज राजवट होती चक्रवर्ती राजा अशोक सम्राट यांची राजवट राजेशाही नव्हती,तर खऱ्या अर्थाने लोकांचे राज्य प्रस्तापित करून उच्च- नीच असा भेद न करता सर्वांना समान न्याय देण्याची व्यवस्था केली,तो दिवस आजचा विजया दशमीचा, म्हणून आपण विजया दशमी दसऱ्याच्या दिवशी साजरी करतो यांचे महत्व पटवून दिले.
याप्रसंगी मंचावरील सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव.मान.व्हि.सी.गेडाम मॅडम, संचालक मान.बि.के.गोवर्धन साहेब,मान.व्हि.के .बोरकर साहेब,मान.सौ.सी.आर.गेडाम मॅडम,मान.यु.एम.गेडाम साहेब,मान.डी.बी.गोवर्धन साहेब, आजीव सभासद मान.कांबळे साहेब,नि.वि. मेश्राम साहेब प्राचार्य एन.एल.शेंडे, पर्यवेक्षक एम.डी.लाकडे, माऊंट विज्ञान महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य पी.जी.रामटेके स्थानापन्न होते.याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुतळ्याजवळील कार्यक्रमाचे संचलन विद्यालयाचे शिक्षक जी.एन.मेश्राम, मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे संचलन प्रा.पी.एन.कन्नाके सर तर आभार प्रदर्शन आर पी.चौधरी सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.