चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी

 

  लाखनी:-मानेगाव जवळ दुर्मीळ सायाळ अथवा सारई (इंग्रजी नाव-पार्कुपाइन)प्राण्याला अज्ञात वाहनांची धडक लागल्याने जखमी अवस्थेत असल्याची माहिती ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने तसेच निसर्गमित्र पंकज भिवगडे,मयुर गायधने यांना अशोका बिल्डकॉनचे पर्यवेक्षक अभियंता नितेश नगरकर यांचे कडून व इतरांकडून सुद्धा मिळाली.ते लगेच घटनास्थळी पोहचून दुर्मीळ सायाळ प्राण्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करू लागले. सोबत ग्रीनफ्रेंड्सचे सर्पमित्र गगन पाल,राकेश हुमे,सौरभ बोरकर व इतर गर्दीतील प्रत्यक्षदर्शी मदत करू लागले.पण शरीरावरील काटे वारंवार उभे करीत असल्याने त्याला सुरक्षित रेस्क्यू करणे कठीण जात होते.तसेच दुर्मिळ प्राण्याला बघण्याकरीता वाहनांची गर्दी तसेच लोकांची खूपच गर्दी महामार्गावर झाल्याने त्याला सुरक्षित पकडणे ग्रीनफ्रेंड्सच्या निसर्गमित्रांना कठीण जात होते.दरम्यान लाखनी वनक्षेत्राचे वनरक्षक जितेंद्र बघेले व फॉरेस्ट गार्ड कृष्णा सानप यांना सुद्धा कळविण्यात आले.काहीवेळाने ते सुद्धा घटनास्थळी पोहचले व पुन्हा नव्या जोमाने जखमी सायाळची सुरक्षित सुटका करणे सुरू झाले.एक तासाच्या परिश्रमानंतर जखमी सायाळला ताब्यात घेण्यात यश आले.तिथून लगेच प्रा.अशोक गायधने यांचे चारचाकी वाहनाने पशुवैद्यकीय चिकित्सक गुणवंत भडके यांच्याकडे आणण्यात आले.तिथेसुध्दा जखमी सायाळ वारंवार काटे उभे करीत असल्याने उपचार करण्यास पशुवैद्यकीय अधिकारी तसेच ग्रीनफ्रेंड्स व वनविभागाचे कर्मचारी यांना अनेक परिश्रम करावे लागले.शेवटी 2 तासांच्या महत्प्रयासाने तिच्यावर उपचार करून अत्यंत गंभीर जखमी झालेल्या डाव्या पायाच्या बोटाचा तुकडा कापण्यात आला व डाव्या पायाची गंभीर जखम शिवण्यात आली. सोबतच इतर जखमांवर सुद्धा उपचार करण्यात आले त्यानंतर पुढील उपचाराकरिता ट्रान्झीट सेंटर गोरेवाडा प्राणिसंग्रहालय नागपूर येथे दुसऱ्या दिवशी वनविभागाच्या वाहनाने हलविण्यात आले.त्याठिकाणी उपचार केल्यानंतर निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात आले. पशु चिकित्सालय लाखनी येथे उपचारवेळी वनविभाग लाखनीचे फॉरेस्ट गार्ड नितीन उशीर, निसर्गसंशोधक विवेक बावनकुळे ,सर्पमित्र सलाम बेग यांनी बरीच मदत केली.लाखनीचे पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी सुद्धा पशु चिकित्सालय येथे भेट देऊन जखमी सायाळ बद्दल चौकशी केली.अशाप्रकारे ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व वनविभाग लाखनीच्या एकत्रित प्रयत्नामुळे दुर्मिळ अशा काटेरी सायाळ जीवदान देण्यात यश मिळाले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com