संजय टेंभुर्णे

कार्यकारी संपादक दखल न्यूज भारत 

मौजा गडकुंडी येथे सेवानिवृत्ती शिक्षकांचा सत्कार घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल किरणापुरे पं.स.सदस्य, प्रमुख पाहुणे श्री बांन्ते साहेब विस्तार अधिकारी प.स., सौ खोटोले मॅडम सरपंच ,मनोज खोटोले, पुजा दूधबर्वे,रामेश्वर डेडमल,कैलास हटकर ,हेमराज उपरीकर ,हेमराज खोटोले, हटवार सर ,खुशाल बनकर, सत्कारमूर्ती यशवंत उरीकर सर, अनिता खोटोले मॅडम शालेय विद्यार्थी व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमात यशवंत उपरीकर सर व अनिता खोटोले मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.शाळापुर्व तयारी उपक्रमात सहभागाबद्दल गावकऱ्यांचे प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त शालेय विद्यार्थी शिक्षक भूमिका, चपराशी भुमिका उत्कृष्ट केल्याबद्दल त्यांना नोटबुक देऊन गौरविण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात अनिल किरणापुरे पं.स.सदस्य म्हणाले की,शिक्षकाबद्दल समाजामध्ये कायम आदराचे आणि मान-सन्मानाचे स्थान असते. यात शिक्षकाचा भय, चिंता यांच्या गाठी शिक्षकांच्या सहज संवादाने दूर होऊ शकतात. विदयार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वत:च्या आयुष्यात नैतिक मूल्याचे आचरण करून समाजासमोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडविणारे शिल्पकार टिकवून ठेवण्यास शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक शिकवण शिक्षक रुजवू शकतो.

जगात कुठेही गुरू आणि शिक्षकांचा आदर केला जातो, काहींना अपार प्रेम दिले जाते, तर काही शिक्षक हे आयुष्यावरच केवळ प्रभाव टाकत नाही तर त्यांच्या जीवनातही स्थित्यंतर घडवून आणतात. शिक्षक विदयार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास सज्ज असतात. जी भावी स्वप्ने (मुलांनी उराशी बाळगलेली असतात ती समजून घेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. शिक्षकाचे काम हे मार्गदर्शक, समुपदेशकाचे किंवा दिशादर्शकाचे असते.

“रवींद्रनाथ टागोर “नेहमी म्हणायचे की शिक्षक आपल्याला उचित व अनुचित यातील भेद ओळखायला शिकवतात शिक्षक हे केवळ ज्ञान देणे नव्हे तर शिक्षणाच्या माध्यमातून देशासाठी उत्तम नागरिक घडण्याची प्रक्रिया होय, शिक्षणाच्या प्रक्रियेत म्हणूनच समाज परिवर्तनाची, समाजाची उत्तम चारित्र्य शिक्षकावरच आहे .शिक्षक हे समाज परिवर्तनाचे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे .असे ते बोलत होते.

सूत्रसंचालन कु. संध्या खडके, आभार सौ.पूजा दुधबर्वे यांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com