संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक दखल न्यूज भारत
लवारी येथे बौद्ध स्मारक समितीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल किरणापुरे पं.स.सदस्य प्रमुख पाहुणे गायत्री टेंभुर्ण सरपंच, विनोद किरणपुरे पोलिस पाटील,सुरेश नगरीकर, उपसरपंच, नरेश नगरीकर, चंद्रशेखर कापगते,विद्या कापगते, वैशाली कापगते,रमा जनबंधू, मोहन समरीत,उपासक,उपासिका व समस्त गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमात मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष भाषणात अनिल किरणापुरे यांनी सांगितले की,तथागत गौतम बुद्ध, बाबासाहेब साहेब मुलांना सांगण्यापेक्षा दाखवणे महत्त्वाचे आहे. आपल्या मुलांना बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीवर घेऊन जा. मुलांचे करिअर त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यांना काय व्हायचे आहे ते जाणून घ्या. त्यांना कोणत्या गोष्टीत आवड आहे हे समजून घ्या.
बौद्ध विचारात व्यक्ती विकासाला महत्त्व आहे.पण तो विकास सामाजिक बांधिलकी व बंधुत्वाशी निगडित आहे. व्यक्तिविकास करताना समाजरित जपणे,अनिवार्य असल्याचे गौतम बुद्धांनी नमूद केले आहे. असे ते बोलत होते.
सूत्रसंचालन हेमराज टेंभुर्ण, प्रास्ताविक हनंवत टेंभुर्ण, आभार चिरंजीव टेभुणे यांनी केले.