कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी :- माझी शाळा,सुंदर शाळा.. या उपक्रमांतर्गत प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर द्वारा शिक्षक दिनी 5 सप्टेंबर 2024 रोजी अप्पर आयुक्त,आदिवासी विकास नागपूर यांचे कार्यालयीन सभागृहात शासकीय अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य शाळेतील उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या ७ उपक्रमशील शिक्षकांना बिरसा मुंडा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार – 2024 देऊन गौरविण्यात आले.
आदिवासी विकास नागपूर विभागाचे उपायुक्त दिगांबर चव्हाण, प्रशासन आदिवासी विकास नागपूरचे साहाय्यक आयुक्त नयन कांबळे,प्रकल्प अधिकारी नितीन इसोकर,आणि शोभा चौहान,सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशासन,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर यांचे हस्ते पारशिवनी तालुकाचे माध्यमिक स्तर..
– श्री.रामदास खवशी,
शाळेचे नाव – शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोलीतमारा, ता. पारशिवनी,जि. नागपुर…
— उच्च माध्यमिक स्तर – श्री. अखिलेश सरोदे..
शाळेचे नाव – साईबाबा अनुदानित आदिवासी आश्रमशाळा टेकाडी, ता. पारशिवनी,जि.नागपूर यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले.
गेल्या वर्षभरात नवचेतना अभियानाद्वारा भविष्यवेधी शिक्षण प्रणाली,आदिनिपुण कार्यक्रम,प्रेरणादायी मार्गदर्शन,टी विथ ट्रायबल सेलिब्रिटी,आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रम,ऋणानुबंध,विद्यार्थी कौशल्य विकास,ब्राईटर माईंड,मेमरी इनहान्स,गुरुशाला,अध्ययन स्तर निश्चिती,स्कॉलरशिप,नवोदय,एमटीएस,एनएमएमएस,जेईई,नीट व विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,विशेष अध्ययन वर्ग उपक्रम इ. प्रकारचे उपक्रम राबविले आहेत.
अशा प्रकारच्या विविध उपक्रमांना यशस्वी करण्याकरिता शाळा व वर्ग स्तरावर आपण उत्स्फूर्तपणे नवनवीन उपक्रम कार्यान्वित करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासात वाढ करण्याचे अमुल्य कार्य शिक्षकांनी केलेले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन शैक्षणिक वर्तन बदल झालेला आहे.
गुणवत्तापूर्ण शाळा,वर्ग व विद्यार्थ्यांसाठी दिलेले योगदान व आपण करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन नागपूर प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य शाळेतील ७ शिक्षकांना “बिरसा मुंडा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2024” देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व इतर शिक्षक,शिक्षकेतर आणि कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्येकांनी आपापल्या शाळेवरील राबविलेल्या उपक्रमाविषयी मनोगत व्यक्त केले.आश्रम शाळेत नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांना प्रशासनामार्फत नेहमीच सहकार्य केले जाईल,असे मत दिगांबर चव्हाण उपायुक्त आदिवासी विकास नागपूर यांनी व्यक्त केले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून शालेय स्तरावर उत्स्फूर्तपणे काम केले पाहिजे असे मत नयन कांबळे सहाय्यक आयुक्त प्रशासन,आदिवासी विकास नागपूर यांनी व्यक्त केले.
हा शिक्षकांचा नाही तर आमचा सुद्धा गौरव आहे,असे मत नितीन इसोकर,प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख अतिथी द्वारा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना सन्मान पत्र,सन्मानचिन्ह,पुस्तक व पेन देऊन सन्मानित करण्यात आले आणि पुढील भविष्यकालीन वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रकल्प कार्यालयातील श्री.राजेंद्र बोचर,श्री.सम्राट माटे,श्री.संदीप शेंडे,सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण,श्रीमती विदेश्वरी ढोके आणि श्रीमती आर. जी. ठाकरे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांचे सहकार्य लाभले.
*****
बिरसा मुंडा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक खालील प्रमाणे…
१) शासकीय आश्रमशाळा –
प्राथमिक स्तर – श्रीमती सुनिता वाघ,
शाळेचे नाव – शासकीय माध्यमिक आश्रम शाळा बेलदा, ता.रामटेक,जि. नागपुर..
२) माध्यमिक स्तर -श्री. रामदास खवशी,
शाळेचे नाव – शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोलीतमारा, ता. पारशिवनी,जि.नागपुर..
३) उच्च माध्यमिक स्तर -श्री.मनोज बोढे,
शाळेचे नाव – शासकीय उच्च माध्यमिक आश्रमशाळा कवडस, ता. हिंगणा,जि. नागपुर..
४) अनुदानित आश्रम शाळा –
प्राथमिक स्तर – श्री.ईश्वर नान्हे,
शाळेचे नाव – गुरुकुल अनुदानित आदिवासी आश्रमशाळा उदासा, ता.उमरेड,जि.नागपुर..
५) माध्यमिक स्तर -श्री. योगेश कोकाटे
शाळेचे नाव – विद्याभारती अनुदानित आदिवासी आश्रमशाळा खापा, ता.नरखेड,जि.नागपुर…
६) उच्च माध्यमिक स्तर – श्री. अखिलेश सरोदे
शाळेचे नाव – साईबाबा अनुदानित आदिवासी आश्रमशाळा टेकाडी, ता. पारशिवनी,जि.नागपूर..
७) एकलव्य शाळा –
समरीन अन्सारी (TGT)
एकलव्य प्रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल खैरी परसोडा,
ता. रामटेक,जि.नागपूर…
८) प्रकल्प स्तर (शिक्षण विभाग) –
संदीप शेंडे,
सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण)
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर..