ऋषी सहारे
संपादक
कुरखेडा:
आदिवासी विविध कार्य.सह.संस्था आंधळी र.न.११२१या संस्थेला केंद्रिय सहाय्यता निधी अंतर्गत शबरी आदिवासी व वित्त विभाग नाशिक कडुन राईस मिल मंजुर झाले असून, सदर कामाचे भुमिपुजन आज दि.६ सप्टेंबर २०२३ ला आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक मुरलिधर बावणे , भाजपा युवामोर्चाचे जिल्हा प्रमुख चांगदेव फाये, संस्थेचे सभापती केशव किरसान, उपसभापती विनोद खुणे, आंधळीचे सरपंच उज्वला रायसिडाम, उपसरपंच अप्रव भैसारे, बेलगावचे सरपंच दिनकर कुमंरे, व्यवस्थापक हेंमत सेंदरे, ग्रा.प.सदस्य नानाजी खुणे ,श्रावण भोंडे,रंजना पुसाम,संचालक जगननाथ जाभुळकर,संजय कवाडकर, दसरथ लाडे,मुरारी मानकर, सखाराम चौरिकर,वाल्मिक वल्केगावातील प्रतिष्टित उदाराम कवाडकर, दिगांबर नाकाडे, खुशाल कवाडकर,पुंडलिक परशुरामकर,रामचंद्र खुणे, सितकुरा गाळगोणे,रमेश नाकाडे,नारायण नाकाडे,केशव भोंडे, व्यवस्थापक मस्के,मेश्राम , लिपिक मानिक दरवडे व गावकरी मंडळी उपस्थित होते.
यावेळी आमदार गजबेंनी सातत्याने पाठपुरावा केल्याने विदर्भात एकमेव आंधळी संस्थेला राईस मिल केंद्रिय सहाय्यता निधी अंतर्गत शबरी आदिवासी व वित्त विभाग नाशिक यांचे कडून मंजूर झाले व बांधकास पुढाकार घेतल्याबाबत आंधळी सस्थेचे गौरव केले व पाण्याची समस्या निराकरण करण्यासाठी आमदार निधीतून संस्थेला बोअरवेल मंजूर करून पाण्याची समस्या सोडविण्याचे वचन दिले व संस्थेच्या पुढिल वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.