गणपती महोत्सव पुर्व पोलीस विभाग व गणेश मंडळाची मार्गदर्शन संयुक्त सभा संपन्न…

 

जिल्हा प्रतिनिधी :- अमान क़ुरैशी

दखल न्यूज भारत

सिंदेवाही

सार्वजनिक गणेश उत्सवाचे अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीतील शहरातील गणेश मंडळ व ग्रामीण भागातील गणेश मंडळ तसेच पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक पंचायत समिती सभागृह सिंदेवाही येथे घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये शासनाने दिलेल्या सूचना त्यांचे पालन करावे तसेच परवानगी कशाप्रकारे घ्यायचे या संबंधाने सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले, शासनाने गणेश उत्सवा दरम्यान करण्यात येणाऱ्या देखाव्या संबंधाने तसेच अक्षय पार्थ देखावे कोणीही करणार नाही या संबंधाने देखील सूचना देण्यात आल्या आहे.

          सदर बैठक ही योगेश शिंदे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली प्रमुख उपस्थिती सपोनी तुषार चव्हाण ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन सिंदेवाही, गायधने साहेब उप कार्यकारी अभियंता एम एस सी बी सिंदेवाही, सुधीर ठाकरे वरिष्ठ लिपिक नगरपंचायत सिंदेवाही, हे उपस्थित होते. सदर बैठकीला 70 गणेश मंडळाचे पदाधिकारी, 42 पोलीस पाटील उपस्थित झाले होते. बैठक चे सूत्रसंचालन पो. अ. रणधीर मदारे गोपनीय कर्मचारी यांनी केली असून आभार प्रदर्शन योगेश लोंढे तालुका अध्यक्ष पोलीस पाटील संघटना सिंदेवाही यांनी केली.