दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील ओम शांती सेंटर केंद्रामध्ये ओम शांती च्या संचालिका प्रीती दीदी यांनी आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची जयंती, गोकुळाष्टमी व ओम शांती केंद्राने आयोजित केलेले सामूहिक रक्षाबंधन असा हा पवित्र त्रिवेणी संगम आज येथे दिसून आला.
यानिमित्त आळंदीतील विविध क्षेत्रातील (सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक) मान्यवरांना ( महिला व पुरुष) आमंत्रित करून ओम शांती केंद्राविषयी माहिती देत प्रीती दिदींनी अतिशय मोलाचे व हृदयस्पर्शी असणारे मार्गदर्शन केले.सर्व उपस्थितांना राखी बांधण्यात आली तसेच ओम शांती केंद्राचे मार्ग दर्शक अशी पुस्तिका पेढे गुलाब पुष्प देऊन सर्वांचे येतोचित असे स्वागत करण्यात आले.उपस्थितांना साबुदाणा वडा केळी यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी आळंदी शहर शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल चव्हाण, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, आळंदी नगरपालिकेचे शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीधर कुऱ्हाडे, तापकीर नाना, शशिकांत येळवंडे, महादेव पाखरे, रवीभाऊ जाधव, रवींद्र गायकवाड प्राध्यापिका अंजली उपाध्ये आदींनी आपापली मनोगते व्यक्त केली. पसायदानाने रक्षाबंधनाचा समारोप करण्यात आला.