छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
मालेवाडा येथील पावर हाऊस स्टेशन मध्ये सकाळी 9:30 वाजता 7.5 फुटाचा अजगर आढळून आला. ही माहिती तात्काळ सर्पमित्र एजाज पठाण यांना देण्यात आली. त्यांनी त्वरित येऊन सापाला पकडले व दूर जंगलात सोडून त्याला जीवदान दिले. त्या अजगराचे लांबी 7.5 फुट असून वजन आठ किलो एवढे होते. सर्पमित्र एजाज पठाण यांनी अत्यंत शिताफीने सापाला पकडले. या कार्याबद्दल अभियंता श्रीनाथ सर, वाकडे आणि तोराम आपरेटर यांनी त्यांचे आभार मानले. एजाज पठाण यांनी सदर सापाबद्दलची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना दिली.