उपसंपादक/ अशोक खंडारे
आष्टी पोलिस स्टेशन च्या हद्दीतून अवैध रित्या दारुची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती च्या आधारे कोनसरी ते सुभाषग्राम मार्गे सापळा रचून चारचाकी वाहनासह ४ लाख ४० हजार रु.ची अवैघ देशी विदेशी दारु आष्टी पोलीसांनी जप्त करुन दोन आरोपी जेरबंद केले आहे.
कोनसरी ते सुभाषग्राम मार्गे छल्लेवाडा कडे मारुती सुझुकी. डिझायर क्र MH 33 V 3689 हे वाहन थांबवून चौकशी केली असता सदर वाहनात देशी दारू १२८००० रुपये , विदेशी दारु ११५०० रुपये, वाहन किंमत ३लाख ५०० रुपये असा चार लाख चाळीस हजार रुपये किंमतीची दारू व दोन आरोपी जेरबंद करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, पोलीस उपनिरीक्षक अजय कुमार राठोड, पोहवा चंद्रप्रकाश निमसरकार, पोलीस शिपाई रविंद्र मेदाळे, राजू पंचफुलीवार, चापोहवा विनोद गौरकार यांनी केली.