चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
लाखनी:-
येथील मानव सेवा मंडळाचे पदाधिकारी सेवानिवृत्त मेजर ऋषि वंजारी यांच्या वाढदिवस त्यांनी गोरगरीब ,निराधार,भटक्या लोकांना सेवा देऊन अभिनव अनोखे असे सामाजिक दायित्व वाढदिवशी निभाविले.
मेजर ऋषि वंजारी हे सुरवातीपासूनच भटक्या, भिकारी किंवा विमनस्क अवस्थेतील मानसिक विकलांग लोकांचे आस्थेने चौकशी करून त्यांची सेवा देतात.आतापर्यंत अनेक भटक्या ,आवारा,मानसिक रुग्ण लोकांची आस्थेने चौकशी करून त्यांना स्वखर्चाने कटिंग, दाढी करून न्हाऊ खाऊ घालत असतात.यावेळेस त्यांनी स्वतःच्या वाढदिवशी केक न कापता लाखनी बसस्थानकावर फिरत असलेला बिहारी यादव तसेच पेंढरी कनेरी येथील निवासी भटक्या चोले इत्यादी विमनस्क भटक्या लोकांची आदराने चौकशी करून त्यांचे विस्कटलेले केस कटिंग दाढी द्वारे व्यवस्थित करून त्यांना न्हाऊ खाऊ घातले त्यानंतर त्यांना कपडे,वस्त्र,चप्पल आदी साहित्य मानव सेवा मंडळा च्या माणुसकीच्या भिंतीतर्फे देण्यात आले व त्यांच्या जीवनात एक नवीन वसंत फुलविण्याचे काम केले गेले .सोबतच त्यांना एक नवीन जीवन जगण्याची प्रेरणा दिली गेली.याचबरोबर “हर घर तिरंगा उपक्रम त्यांनी मानव सेवा मंडळ,गुरुकुल आय.टी.आय. व ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबच्या सहकार्याने राबवून स्वातत्र्यांचा अमृत महोत्सव लाखनीत विविध उपक्रमांनी साजरा केला.लाखनी बसस्थानकावर ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने तयार केलेल्या “नेचर पार्क’ वर ते आठवडयातून दोनदा लष्करी शिस्तीने कवायत,नृत्य व्यायाम,योगा व्यायाम करवुन घेऊन प्रार्थना घेतली जाते व सोबतच मानव सेवा मंडळाच्या, ग्रीनफ्रेंड्सच्या सभासदांच्या वाढदिवसानिमित वृक्षकुंडी दान तसेच वृक्षारोपण केले जाते. मेजर ऋषि वंजारी यांनी सुद्धा वाढदिवसानिमित वृक्षारोपण व वृक्षकुंडी दान सुद्धा केले.यावेळी सेवानिवृत्त महसूल निरीक्षक गोपाळ बोरकर यांनी इन्स्पेक्टर आशिष बोरकर सावली मुल व स्वतःच्या वाढदिवसानिमित्ताने दोन वृक्षकुंडी तसेच सेवानिवृत्त प्राचार्य अशोक हलमारे यांनी एक वृक्षकुंडी तर कापड व्यावसायिक रमेश गभने यांनी दोन वृक्ष कुंडीचे दान वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबला दान केले.
यानंतर मेजर ऋषि वंजारी यांचा रीतसर वाढदिवस लाखनी बसस्थानकावरील ‘नेचर पार्क’ येथे कॅप्टन रविंद्र रुपचंद गायधने,कॅप्टन चंद्रमणी वैद्य, तसेच सैनिक कल्याण भंडाराचे विश्वस्त व सेवानिवृत्त हवालदार होमदेव हटवार यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले.यावेळी मानव सेवा मंडळाचे ऍड. शफी लद्धानी,गुरुकुल आय.टी.आय प्राचार्य खुशालचंद मेश्राम,रामकृष्ण गिर्हेपुंजे,विनायक कावळे,रमेश पालांदुरकर,माणिक निखाडे, शिवलाल निखाडे,अशोक हलमारे,गोपाळ बोरकर,कॉन्स्टेबल सार्वे,नरेश इलमकर ,डॉ.विकास गभने, रमेश गभने,जाधव सर,सुनील खेडीकर, भीमराव गभने,तारांचंद गिर्हेपुंजे, दुलीचंद बोरकर,वसंत मेश्राम,डॉ. दिलीप अंबादे, डॉ. इलमकर ,पी. एस.मटाले, तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे प्रा. अशोक गायधने,अशोक वैद्य, ज्ञानेश्वर लांडगे, मंगल खांडेकर,अशोक नंदेश्वर,मारोतराव कावळे इत्यादींनी मेजर ऋषि वंजारी व इतर सभासदांचे अभिष्टचिंतन यावेळी वाढदिवसानिमित्ताने केले.याचसोबत सर्व मानव सेवा मंडळाच्या सभासदांनी प्रा.अशोक गायधने यांचे ज्येष्ठ भातृ व विदर्भ कोकण बँक व्यवस्थापक अरविंद गायधने यांच्या दुःखद अपघाती निधनाबद्दल त्यांच्या घरी सांत्वनापर भेट देऊन सर्वानी शोकसंवेदना व्यक्त केल्या व त्यांच्या शोकग्रस्त कुटुंबियांना धीर दिला.मेजर ऋषि वंजारी यांनी सुद्धा सामेवाडा येथील वंजारी यांच्या घरी तरुण मुलांने व्यथित होऊन केलेल्या आत्महत्येचे कारण जाणून घेण्याकरिता सांत्वनापर भेट दिली व शोकग्रस्त कुटुंबियांना धीर दिला.