प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
शहरातील नकोडा या गावातील सरवली आसम या उलगुलान कामगार संघटनेच्या कामगाराची सिलेंडर स्फोटात पत्नीसह जखमी होऊन तीन महिन्यापूर्वी दोघेही मृत पावले. जखमी अवस्थेत असताना उलगुलान संघटनेने त्यावेळी तात्काळ ७० हजाराची मदत केली होती परंतु त्यांचा जीव वाचविता आला नाही. सदर कामगाराची मुले लहान असल्याने त्यांना आर्थिक मदत म्हणून उलगुलान संघटनेने संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या उपस्थितीत ९३३२६/- रुपयाचा निधी गोळा करून दिला.
सरवली आसम हा उलगुलान संघटनेचा नोंदणीकृत सदस्य होता. अचानक सिलेंडरच्या स्फोटात त्याचा त्याच्या पत्नीसह जीव गेला. ही घटना फार गंभीर होती सदर कामगाराला व त्याच्या पत्नीला वाचाविण्याकरता उलगुलान संघटनेने सर्वोत्तपरी प्रयत्न केले परंतु त्यांचा जीव वाचवता आला नाही. सदर कामगाराचे कुटुंब उघड्यावर पडलेले असून त्याची सर्वस्वी जबाबदारी उलगुलान संघटनेने घेतली आहे. कामगारांच्या मुलांना व कुटुंबाला आधार म्हणून राजू झोडे यांनी आपल्या कामगारांना मदतीच्या सूचना दिल्याबरोबर कामगारांनी आपल्या पगाराच्या पैशातून आर्थिक निधी गोळा केला व कुटुंबास सुपूर्द केला. उलगुलान संघटना नेहमी कामगाराच्या सोबत असून कामगाराला कोणतीही अडचण पडल्यास सदैव सोबत असते असे मत संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी आपल्या कामगारांसमोर मांडले. उलगुलान संघटना सदैव कामगारांच्या सोबत असून कामगारांच्या हितासाठी नेहमी झटत असते. सरवली आसम या कामगाराच्या सोबत उलगुलान कामगार संघटना असून त्यांच्या दुःखात सहभागी आहे. सदर कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची बळ मिळो अशी भावना संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी व्यक्त केली . कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत करताना राजू झोडे, श्याम झिलपे, अमित कुंभारे, मोहम्मद अली, नूर भाई, हंसराज लांडगे, अजय रोहिदास, जुबेर पठाण, मुसा शेख, उदय चौधरी तथा अन्य उलगुलान कामगार संघटनेचे कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.