ऋषी सहारे

संपादक

 

 आरमोरी – तालुक्यातील जोगीसाखरा गटग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मजुरांना 27 हजार मनुष्य दिवस काम उपलब्ध होऊन 68 लाख रुपये मजुरांच्या बँक खात्यात मजुरी अदा करण्यात आली . ही कामगिरी करीत तालुक्यात द्वितीय क्रमांकाचा मान जोगीसाखरा गट ग्रामपंचायतीने पटकाविला. जोगीसाखरा गट ग्रामपंचायत अंतर्गत जोगीसाखरा , सालमारा , कनेरी आदी तीन गावांचा समावेश आहे . तिन्ही गावात 1 हजार 500 नोंदणीकृत मजूर आहेत . मजुरांच्या हाताला काम मिळावे , यासाठी तलावांचे खोलीकरण , भात खाचराची . तलाव निर्मिती , मामा खोलीकरण , रोपवाटिकेत रोपे लागवड आदींसह विविध कामे करून गावातील मजुरांना 27 हजार मनुष्य दिवस कामे देण्यात आली . प्रत्येक कुटुंबातील मजूर राबल्यामुळे कुटुंबात 50 ते 60 हजार रुपयापेक्षा अधिक रक्कम मजुरी म्हणून अदा करण्यात आली . प्रती मजूर 14 ते 18 हजार रुपये प्रमाणे एकूण 68 लाख रुपये मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले . विशेष म्हणजे , 24 ऑगस्टला रोहयो विभागाच्या उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांच्या चमूने येथील कामाची पाहणी केली . यावेळी तहसीलदार कल्याणकुमार डहाट , जलसंधारण अधिकारी माणिक बन्सोड , एपीओ निमगडे , प्रभारी सरपंच संदीप ठाकूर , नरेगा कार्यक्रम अधिकारी स्वप्नील रायपूरे , सहायक कार्यक्रम अधिकारी शैला भीमगडे , तांत्रिक अधिकारी देवेंद्र चलाख , निलेश राजगडे , तांत्रीक अधिकारी अस्विनी सहारे , ग्रापं सदस्य स्वनिल गरफडे , देवदास ठाकरे , गुरुदेव कुमरे , प्रतिभा मोहुर्ले , अश्विनी घोडाम , करीष्मा मानकर , जोती घुटके , वैशाली चापले , ग्रामसेवक एन . डी . कलंगा , ग्रामरोजगार सेवक राजू सोरते उपस्थित होते . जोगीसाखरा गटग्रामपंचायतचे सरपंच संदीप ठाकूर , सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम , पंसच्या माजी सदस्या वृंदा गजभिये यांनी केलेल्या परीश्रमामुळे आरमोरी तालुक्यात जोगीसाखरा गटग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक मिळाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com