सावली (सुधाकर दुधे)

 

सावली तालुक्यातील

-उपरी येथील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते स्व.मधुकर पत्रुजी मोहूलै वय ५५ वर्ष ह्याना दोन दिवस आधी ताप आले होते.या तापाच्या अल्पशा आजाराने त्याचा मृत्यू झाला.कुटुंबातील कमावता व्यक्ती गेल्याने गावात हडहड व्यक्त केल्या गेले.

     तसेच उपरी येथील घडलेल्या घटनेच्या संबंधित माहिती तालुकाध्यक्ष अविनाश पाल व भाजपाचे युवा नेते किशोरजी वाकुडकर यांनी माहिती दिली असता यांची दखल घेत या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनी याबाबतचे गांभीर्य लक्षात घेत उपरी येथील मृत्यू् पावलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन कुटुंबियाचं सांत्वन केल.

    यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी यांना खा.अशोकजी नेते यांनी दूरध्वनीवरून या संदर्भाची दखल घेत उपरी येथे आरोग्य शिबिर,आरोग्य तपासणी कॅम्प घेण्याच्या सूचना केल्या.

    तसेच संबधीत स्व.चरण कोठारे वय ४५ वर्ष हे व्यक्ति अल्प भूधारक असल्याने कर्ज व कुटुंबाची जबाबदारी या विवंचनेतून त्याचा मृत्यू झाला.याची सुद्धा माहिती मिळताच या क्षेत्राचे लोकप्रिय खा.अशोकजी नेते यांनी मृतकाच्या परिवारांची घरी जाऊन आर्थिक मदत देऊन परीवारांचे सांत्वन केले.

 

या प्रसंगी खा.अशोकजी नेते गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, अविनाश पाल तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा, संतोषभाऊ तंगडपलीवार माजी सभापती जि.प.चंद्रपूर,सौ.योगिता धनराज डबले माजी जि.प.सदस्या, भालचंद्रजी बोदलकर भाजपाचे जेष्ठ नेते,गणपतजी कोठारे माजी.पं.स. कुनघाडकर सर सामाजिक कार्यकर्ते,किशोरजी वाकुडकर भाजपाचे युवा नेते,डियेचजी आभारे युवा नेते,खुशालजी बोदलकर संचालक कृ.उ.बा स. सावली,शामसुंदरजी सा.चिटमलवार,वासुदेवजी सातपुते सामाजिक कार्यकर्ते,बाबुराव भुरसे, पुरुषोत्तम मोहुरले, धनराज भांडेकर सुरेश भांडेकर,गणेश कोहळे,दामोदर भांडेकर,तसेच अनेक भाजपाचे कार्यकर्ते,पदाधिकारी,गावातील मंडळी, उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News