सावली (सुधाकर दुधे)

 

 घरातील रस्त्याच्या वादातून लहान भावाने दादा-वहीणीला ठार केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यात उघडकीस आली.या घटनेने खळबळ उडाली आहे.मनोहर गुरनुले ( वय 62 ), शारदा गुरनुले ( वय 58 ) असे मृतकांची नावे आहेत.घटनेची माहीती मिळताच पाथरी पोलीसांनी घटनास्थळ गाठले.आरोपी धनराज गुरनुले याला अटक केली आहे.

 

जिल्ह्यातील सावली तालुक्यात येणाऱ्या गायडोंगरी गाव दुहेरी हत्येने आज हादरला आहे.गावातील मनोहर गुरनुले आणि त्यांचा लहान भाऊ धनराज गुरनुले यांच्यात घरातील रस्त्यावरून नेहमी वाद व्हायचा.आज सकाळी 10 वाजता रस्त्यावरून सूरू झालेल्या वादाने टोक गाठले.रागाचा भरात धनराज गुरनुले याने सबलीने ( लोखंडी खंदक ) मोठा भाऊ मनोहर गुरनुले याला मारहाण केली.आपल्या पतीला वाचविण्यासाठी गेलेल्या शारदा गुरनुले हीला ही सबलीने मारहाण केली.या घटनेत मनोहर गुरनुले यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला.जखमी अवस्थेत शारदा गुरनुले हीला गडचीरोली येथे उपचारासाठी हलविण्यात आले.मात्र उपचारा दरम्यान तिचाही मृत्यू झाला.घटनेची माहीती पाथरी पोलीस स्टेशनला कळविण्यात आली.घटनास्थळी पोलीस उप विभागीय अधिकारी इंगळे यांनी भेट दिली.आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.पुढील तपास ठाणेदार मंगेश मोहाड करीत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com