उपसंपादक/अशोक खंडारे
आष्टी येथे पूर्णवेळ वाहतूक नियंत्रक नसल्यामुळे आष्टीच्या तीस किलोमीटर परिसरातील शासकीय कर्मचारी, विद्यार्थी यांना मानसिक,आर्थिक त्रास शारिरीक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे आष्टी येथील बस स्थानकावर पूर्णवेळ वाहतूक नियंत्रक देण्याची मागणी प्रा. डॉ. भारत पांडे अध्यक्ष ओम विकास बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारा श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, विभागीय नियंत्रक गडचिरोली,आगार व्यवस्थापक अहेरी यांना पत्राद्वारे केलेली आहे. आष्टीच्या 30 किलोमीटर परिसरातील बोरी, चपराळा, येणापूर,विठ्ठलवाडा,ठाकूर नगर गोमनी या परिसरातील जनतेला, शासकीय कर्मचारी, शालेय विद्यार्थी यांना आष्टी येथील बसस्थानकावर विद्यार्थी पास, कर्मचारी मासिक पास, त्रेमासिक पास,आवडेल तिथे प्रवास अशा विविध योजना करिता सुविधा होती पण गेल्या दोन वर्षापासून आष्टी येथील वाहतूक नियंत्रकाला पाठविणे बंद केलेले आहे पूर्वी अहेरी येथून नियमित वाहतूक नियंत्रण येत होते परंतु आता केवळ गुरुवार आणि शुक्रवार या या दोन दिवसांकरिता पाठवणे सुरू केले परंतु तेही आता पाठवणे बंद झाल्यामुळे या परिसरातील जनतेला विद्यार्थ्यांना पास करण्याकरिता अहेरी, गोंडपिपरी, गडचिरोली या दूरवरच्या वाहतूक नियंत्रक केंद्रावर अवलंबून राहावे लागते त्यामुळे जनतेला आर्थिक आणि मानसिक त्रास होतो तर पालक वर्ग विद्यार्थ्यांना प्रवास खर्च जास्त लागत असल्यामुळे विशेषतः मुलींना पालक वर्ग कॉलेजमध्ये पाठवीत नाही किंवा त्यांना पाठवणं कमी केल्यामुळे मुलींच्या भविष्याच्या प्रश्न निर्माण झालेला असून दुसरीकडे एका वर्षाचे अंदाजे आष्टी केंद्रावरील वाहतूक विभागाचे वीस लाखाचे उत्पन्न कमी झालेले असून आष्टी केंद्रावर नियमित वाहतूक नियंत्रक अधिकारी मिळाल्यास खाजगी वाहतुकीवर आळा, प्रवाशांना येणाऱ्या जाणाऱ्या बसची माहिती जनतेला व विद्यार्थ्यांना सर्व सुविधांचा लाभ होत असल्यामुळे आष्टी येथे नियमित वाहतूक नियंत्रक अधिकारी देण्याची मागणी प्रा.डॉ. भारत पांडे यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे केलेली आहे जवळपास सहा महिन्यापासून फोन द्वारे विविध अधिकाऱ्याची फोन करून चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याची मागणी वारंवार ते करीत आहे यानंतर देखील शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास विद्यार्थी व जनतेच्या सहकार्याने आंदोलन करण्याच्या इशारा देखील दिलेला आहे.