नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

 

साकोली:दाजीबानगर किन्ही येथील नागरिकांचे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलचा लाभ मिळण्यासाठी दाजीबानगर वनहक्क जागेचे पट्टे मिळण्याबाबद उपवनसंरक्षक भंडारा राहुल गवई यांची दाजीबानगर किन्ही येथील नागरिकांसोबत भेट घेतली. 

तसेच मौजा उकारा(विर्शी) ता.साकोली येथिल वन हक्क शेतजमीन अतिक्रमण दाव्या संदर्भात भंडारा जिल्हा उपवनसंरक्षक गवई यांचेसोबत दावा निकाली काढण्याबाबत सविस्तर चर्चा केली.25 वर्षापासून अतिक्रमित जमिनीवर दावा असून गावातील काही विघ्नसंतोषी लोक मोलमजुरी करणार्‍या गरीब व्यक्तीचा शेतजमीन दावा रद्द करून आपला दावा दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहेत. या अन्यायाविरोधात संबंधित अधिकार्‍याचे लक्ष वेधले आणि अन्याय होणार नाही असे आश्वत केले व सोबत निवेदन दिले. उपवनसंरक्षक गवई यांनी सकारात्मक बोलत लवकरच पुढील कारवाई करू असे सांगितले. यावेळी जि.प.सदस्या सौ.माहेश्वरीताई नेवारे, किन्ही ग्रा.प.सदस्य आनंदाराव मांदाडे , हेमराज नेवारे, रामकृष्ण शेंडे तसेच उकाराचे यशवंत मोटघरे आणि शिवचरण सोनवाने उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com