उपसंपादक/ अशोक खंडारे
चामोर्शी तालुक्यातील आष्टी ग्रामपंचायत च्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती च्या अध्यक्ष पदी प्रेम गोडबोले यांची निवड करण्यात आली.
शिक्षक दिना निमित्त तहकूब झालेली ग्रामसभा शिक्षक दिनी आयोजित करण्यात आली होती .या ग्रामसभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच बेबीताई बुरांडे ह्या होत्या . यावेळी उपसरपंच सत्यशिल डोर्लीकर, ग्राप सदस्य कपील पाल, दिवाकर कुंदोजवार, छोटू दुर्गे, संतोष बारापात्रे, रेषमा फुलझेले ,पुण्य बावणे, विघा जुनघरे,आंबटकर तलाठी सचिन गुरनुले, पत्रकार अशोक खंडारे, आदी मान्यवर उपस्थित होते
तमुस अध्यक्ष पदासाठी चार नावे पुढे आली त्यापैकी एकाने माघार घेतली प्रभुदास खोब्रागडे,प्रेम गोडबोले,व प्रविण तिवाडे हे तिघे असल्याने एकमत होऊ शकले नाही त्यामुळे निवडणूक घेण्यात आली तेव्हा सर्वाधिक मते प्रेम गोडबोले यांनी मिळून आलीत म्हणून त्यांची निवड करण्यात आली .
या ग्रामसभेला बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.