प्रतिनिधी: पारशिवनी-नवेगाव खैरी राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी येथे ५ सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त स्वयं शासन उपक्रमांतर्गत एक दिवसाची शाळा भरली. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक, शिपाई व अशा सर्व भूमिका विद्यार्थ्यांनी चोख बजावल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त शिक्षक व पत्रकार गोपालराव कडू, उद्घाटक सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती जांभूळकर, कार्यक्रमाध्यक्ष मुख्याध्यापक एस. आर. धोटे यांनी यांचे हस्ते स्वयं शासन उपक्रमातील उत्कृष्ठ शिक्षिका प्रथम क्रमांक अंजली दिवटे, द्वितीय सेजल कळमकर, तृतीय नंदनी ढोंगे, लिपिक कुश ढोरे, शिपाई रोहित मुंगभाते, पाककला सानिया राऊत, उत्कृष्ट वक्ता दिपाली वारकर, विद्यार्थी रिद्धी यांना बक्षीस प्रदान करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकाची भूमिका अनन्यसाधारण असल्याने विद्यार्थी शिक्षकांनी शाळेच्या शिक्षकांना *दीपस्तंभ गौरव* समर्पित करून सन्मानित केले. याप्रसंगी शिक्षक साक्षोधन कडबे, नीलकंठ पचारे, दिलीप पवार, सतीश जुननकर, शैलेंद्र देशमुख, सौ. तारा दलाल, अमित मेश्राम, प्रा. अरविंद दुनेदार, प्रा. धर्मेश वाघुके, प्रा. राजेश टेकाडे, लिलाधर तांदूळकर, मोरेश्वर दुनेदार, गोविंदा कोठेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी मुख्याध्यापक सेजल राऊत, संचालन दहावीची सेजल ढोरे हीने तर आभार प्रदर्शन आयेशा सहारे हीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सैबाज शेख, निशा बेदरे, रिया गजभिये, रुचिका बरडे, संचिता भोयर, खुशी ढोंगे, श्रुती तीळगाम, नंदनी ढोरे, कार्तिक राऊत, समीक्षा रेवडे, नम्रता सहारे, गायत्री मुंगभाते, तनुश्री राऊत, अनिकेत दुनेदार आणि शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.