शहर पथविक्रेता विकास समीतीच्या २ जागेच्या निवडणूकीत वैभव बंसोड व अंकूल इंकने यांचा विजय…

     राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

        कूरखेडा नगरपंचायत अंतर्गत पथ विक्रेता संघाचा खूल्या गटातील २ जागेकरीता आज घेण्यात आलेल्या प्रत्येक्ष निवडणूकीत वैभव बंसोड व अंकूल इंकने यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगरपंचायतचे मूख्याधिकारी पंकज गावंडे यानी जबाबदारी पार पाडली. 

        पथविक्रेता संघाचा ८ सदस्यीय असलेल्या समीतीवर यापूर्वीच खूला महिला गटातून चंन्द्रीका नेवारे,इतर मागास वर्गीय गटातून रमेश रासेकर अल्पसंख्यक गटातून अशपाक खान अनूसूचित जमाती गटातून रामचंद्र कूंभरे हे अविरोध निवडून आले आहे.

         विकलांग महिला राखीव गट व अनूसूचित जाति महिला गटातून कूणीच नामांकन दाखल न केल्याने या जागा रिक्त आहेत. खूला प्रवर्गाचा २ जागेकरीता घेण्यात आलेल्या प्रत्येक्ष निवडणूकीत ४ उमेदवार होते.

          यावेळी एकूण ५६ मतदारा पैकी ५३ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला ५ मते अवैध ठरली.वैध ४८ मतापैकी अंकूल इंकने याना ३६ तर वैभव बंसोड याना ३४ मते मिळाल्याने त्याना विजयी घोषित करण्यात आले.

          वरील निवडणुकीत विजयी उमेदवारांचे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल, तालुका प्रमुख तथा न.प.गटनेता आशिष काळे, वरिष्ठ पत्रकार राम लांजेवार, सभापती अशोक कंगाले, आसिफ शेख,सद्दाम भाई यांनी शुभेच्छा दिल्या.