युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेचे दर्यापूर शहरात आज दि.05/08/2024 रोजी आगमन झाले.
या प्रसंगी शहरामध्ये ठिकठिकाणी जल्लोषात यात्रेचे स्वागत करण्यात आले. माहेश्वरी भवन येथे आयोजित सभेला बाळासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना मराठा, कुणबी वाद चिघळू नये या साठी सरकारने आरक्षणच्या संदर्भात ठोस भूमिका घ्यावी.
तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात सध्या आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर हे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधत आहेत.
अशातच आंबेडकर यांनी दर्यापूर इथं बोलत असताना जरांगे पाटलांवर निशाणा साधत जरांगे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच उभं केलं असल्याचा घणाघाती आरोप केला आहे.
आरक्षण बचाव यात्रेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “मनोज जरांगे पाटील हा शरद पवार यांनीच उभा केलेला माणूस आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी २८८ मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला नाही तर त्यांच्यामागे पवारांचाच हात असल्याचं सिद्ध होईल,” असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.
आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आम्ही आगामी निवडणुकीत राज्यात १०० ओबीसी आमदार निवडून आणू, अशी घोषणा केली आहे. “मनोज जरांगेंची जी ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी आहे.
त्यामुळे राज्यात दोन तट पडले आहेत. राजकीय भांडणाचे सामाजिक भांडणात रुपांतर करण्याचे अनेकांचे मनसुबे ओबीसी आरक्षणाच्या यात्रेतून उध्वस्त झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या नंतर सरकार ओबीसींची जातनिहाय जनगणना मान्य करून घेईल. तसेच जात जनगणनेची आकडेवारी जोपर्यंत येत नाही तो पर्यंत ओबीसी आरक्षणावर स्थगिती दिली जाईल.असा निर्णय घेतला जाईल, असे अनेक जण सांगत आहेत.
त्यामुळे आम्ही किमान १०० ओबीसी आमदार निवडून आणू ,असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ओबीसी समाजाने विधानसभेमध्ये 100 आमदार निवडून आणावे असे आवाहन ओबीसी समाजाला केले.
या प्रसंगी जिल्हा प्रभारी पुंडकर साहेब, निलेशजी विश्वकर्मा, ओबीसी नेते अविनाश भोसिकर, पुंडलीकराव वाठ, गणेशराव कुटेमाटे, साहेबराव वाकपांजर, संजीवन खंडारे, ऍड संतोष कोल्हे, संतोष बगाडे, अतुल नळकांडे, संजय चौरपागर, प्रवीण लाजुर कर, चंदु रायबोले , महेंद्र कांबळे, डॉ प्रकाश तायडे, विपीन अनोकर, रामजी राठोड, रवी आठवले, शोभा गावंडे, रेखा इंगळे, सत्यफुला, वंदना गावंडे, सुमेध खंडारे, यश कांबळे, विरेंद्र दुधांदे, उत्कर्ष चोरपागर,किशोर रायबोले भिमराव कुऱ्हाडे लक्षमन उमाळे,, सदानंद नागे , अमोल नवलकर, विजय चौरपगार ,अविनाश आठवले, देवराव वाकपांजर, ऋषीकेश पटांगे सूत्रसंचालन संदीप बगाडे व आभार प्रदर्शन बाळासाहेब टोबरे यांनी केले.