कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवणी
पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील पेठ येथे कालभेरव, घोघरा येथे महादेव देवस्थान व पारशिवनी येथील प्रसिद्ध अति प्राचीन त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी प्रमाणे प्रथम श्रावणी सोमवार निमित्त त्रयबकेश्वर महादेव मंदिरात सप्तक्षृंगी महिला भजन मंडळ तर्फे यांच्या मार्गदर्शनात सोमवारी सकाळी श्री त्रयबकेश्वर महादेव मंदिरात महाअभिषेकाने श्रावण मास शुभारंभ करण्यात आला.
दुपारी सप्तश्रृगी महिला भजन च्या प्रमुख रेखा बबनराव भोयर, विणा विनोद भुते, मयुरी अनिल तरार , सविता प्रमोद डोमकी , उषा सुरेश डोमकी, चन्द्रकला बालपांडे , मंगला राजु दुधकवडे, सुनिता गायकवाड व निशाने सर तर्फे अभिषेक करून पुजा करून बेलपत्री अर्पण करून दुपारी भजन किर्तन चे कार्यक्रमा नंतर सांयकाळी महा आरती नंतर फराळचा अल्पोहार वितरण करण्यात आले.
भाविकांनी मोठी गर्दी केली होती तसेच पेठ येथिल कालभैरव मंदिर व घोघरा महादेव देवस्थान येथे कमेटी तर्फे अभिषेक करून प्रसाद् वितरित करण्यात आले.