१५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचे करण्यात आले आयोजन. — वन-महोत्सवातंर्गत वृक्षारोपण मोहिम राबविली जाणार.. — वन महोत्सवात सहभाग घेवून वृक्षारोपण करावे.:- प्रविण लेले वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेवानी ( नागलवाडी) क्षेत्र यांचे आव्हान…

   कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाला महत्व आहे. यामुळे शासनाकडूनही वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनावर भर दिला जात आहे. 

      याच हेतुने संपूर्ण राज्यात १५ जूनते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या वनमहोत्सवातंर्गत वृक्षारोपण मोहिम राबविली जात आहे.

       सामाजिक वनीकरण रोपवाटिकांमध्ये मोफत व सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध आहेत. 

      यामुळे नागरिकांनी वसुंधरेला वृक्षाच्छदीत करण्यासाठी हातभार लावावे,असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण लेले यांनी सांगितले.

        रोपवाटिकेत विविध प्रजातीचे रोपटे उपलब्ध आहेत.वृक्षांची घटत्या संख्येने पर्यावरण असंतुलित होत चालले आहे. 

        वाढते तापमान याचेच उदाहरण आहे.याचा परिणाम सर्वच बाबीवर पडताना दिसून येत आहे.यामुळे पर्यावरण संवर्धानाचा विषय प्रत्येकाची जबाबदारी झाली आहे.

      शासनाकडूनही वृक्षारोपणाला घेवून मोहिम सुरू करण्यात आली आहे.१५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

         या मोहिमेतंर्गत वृक्षारोपण करून संवर्धनाचा ध्यास घेतला जात आहे.यासाठी सामाजिक वनीकरण परिक्षेत्अंतर्गत रोपवाटिका येथून शासन तरतूदीनुसार वनमहोत्सव कालावधीत सर्व शासकीय संस्था स्थानिक स्वराज्य संस्था,पोलीस व संरक्षण दल यांना मोफत रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 

       तसेच,सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अंतर्गत रोपवाटिका आहे.यामध्ये विविध प्रकारचे रोपे उपलब्ध आहेत.यामध्ये रोपवाटिकेत सागवन,औषधी वनस्पती जसे बेहडा,हिरडा,तुळशी,खाण्याचे पान,महानिंब,रिठा,बेल पानफुटी,अमलतास इत्यादी,सावली व फळ देणारे जसे जांभुळ,सिताफळ,कडुनिम,कदंब,गुलमोहर चिचवा इत्यादी,शोभवंत झाडे जास्वंद,गुलाब व इतर येथील रोपवाटिकेत सागवन,मोहा,हिरडा,बेहडा,महानिंब,मुलमोहर कदंब,सिताफळ,बेहडा,कडुनिंम, जांभुळ,करंज,जारुळ,पारसपिंपळ,वड,शिसू इत्यादी प्रजातीचे रोपे उपलब्ध आहेत.

      सर्वसामान्य नागरिक,वृक्षप्रेमी,शेतकरी यांना सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.तरी, सर्व नागरिक,पर्यावरणप्रेमी,शेतकरी,शासकीय संस्था,स्थानिक स्वराज्य संस्था,पोलीसव संरक्षणबल यांनी जास्तीत जास्त संख्येने पुढाकार घेवून वसुंधरेला वृक्षाच्छदीत करण्यासाठी हातभार लावावे,असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांनी केले आहे.