दिनेश बनकर

कार्यकारी संपादक 

दखल नुज भारत 7822082216

गडचिरोली: रामनगर येथे वास्तव्यास असलेली महिला भारती मुनघाटे वय 30 ही महिला पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार यांच्या घरून सकाळी 9 वाजताच्या दरम्यान स्वयंपाक करून घरी जात असताना रामपुरी वॉर्ड कॅम्प एरिया येथे माकडानेआकस्मिक हल्ला करून तिला जखमी केले. व घटना माहीत झाल्याबरोबर तात्काळ तिला मनिषा प्रवीण चन्नावार यांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती केले असून तिच्यावर उपचार सुरू आहे. यापूर्वी सुद्धा एका मुलावर माकडाने हल्ला केला होता. माकडे गावात येऊन लोकांवर हल्ला करीत असून वनविभागाने त्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत असून या परिसरात माकडांनी धुमाकूळ घातला असून लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी महिला गरीब असून तिला वनविभागाने त्वरीत नुकसान भरपाई भरपाई द्यावी अशी मागणी कटूंबियानी वार्डातील नागरिकांनी केली आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com