वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे
वाशिम:- अनुभव शिक्षा केंद्रा अंतर्गत दि. 6/7/2022 रोजी अमरावती /वाशिम जिल्ह्यातील अनुभव मित्र,सहयोगी,साथी यांच्यासोबत ऑनलाइन स्वरूपाची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये महिन्यातील नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील युवक व युवतींचा सहभाग होता.तसेच या बैठकीला अनुभव साथी मा.सतीश भगत उपस्थित होते.अनुभव शिक्षा केंद्राचे अमरावती वाशिम जिल्हा प्रशिक्षक मा.आशिष धोंगडे यांनी या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.या बैठकीमध्ये अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील जिल्हास्तरीय कमिटी व अनुभव मित्रांसोबत चर्चा करण्यात आली.दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम घेण्याबाबत व उद्बोधन कार्यक्रम, वृक्ष लागवडी व विविध स्वरूपाच्या कार्यक्रम आयोजित करण्याबाबत बैठकीमध्ये युवकांनी चर्चा केली.याप्रकारे या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली बैठकीमध्ये अनुभव शिक्षकेंद्रातील युवक युतीने स्वतः मधले झालेले बदल सांगण्यात आले.अशाप्रकारे ही बैठक संपन्न झाली…
आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत