प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा राजुरा च्या वतीने बुद्धभूमी, बस स्टँड समोर, राजुरा जी. चंद्रपूर येथे धम्म प्रबोधन तथा केंद्रीय शिक्षकाचा सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रम चे अध्यक्ष धरमुजी नगराळे अध्यक्ष भा बौ म राजुरा तालुका होते तर प्रमुख मार्गदर्शक अशोक घोटेकर, विदर्भ प्रदेशादक्ष भा बौ म , नेताजी भरणे जिल्हाध्यक्ष भा बौ म चंद्रपूर , सुजाता लाटकर जिल्हा उपाध्यक्ष, सपना कुंभारे जिल्हा उपाध्यक्ष, कृष्णाक पेरकावर जिल्हा सचिव, गुरुबालक मेश्राम मेजर समता सैनिक दल, यांनी मार्गदर्शन केले. या धम्म मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून चरणदास नगराळे, श्रावण जीवने अध्यक्ष कोरपना तालुका, वाघ साहेब भद्रावती, गौतम चौरे सरचिटणीस राजुरा तालुका, गुलाब दरेकर, सरचिटणीस राजुरा तालुका, .मेघाताई बोरकर अध्यक्ष राजुरा शहर, सुजाता नळे सरचिटणीस राजुरा शहर, किरण खैरे कोषाध्यक्ष राजुरा शहर उपस्थित होते.
कार्यक्रम च्या दुसऱ्या सत्रमंध्ये माता रमाई च्या स्मृती दिन निमित्त दि 21 ते 27 मे 2022 मंध्ये चैत्यभूमी मुंबई येथे “केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिर” मधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सहा केंद्रीय शिक्षिका सपना कुंभारे, प्रगती मेश्राम चंद्रपूर, गायत्री रामटेके, पंचशीला वेल्हे बल्लारपूर, मिली वाघ भद्रावती, रमा पाटील, महकुरला ,याचा भारतीय बौद्ध महासभा,राजुरा तालुका व चंद्रपूर जिल्हा च्या वतीने गुलदस्ता व प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला. या सर्व केंद्रीय शिक्षिका नि आपले मनोगत व भा बौ म च्या प्रशिक्षण चा अनुभव व्यक्त केले. बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विद्यान वादी बौद्ध धम्म चा प्रचार व प्रसार भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या जोमाने या नवीन केंद्रीय शिक्षिका करतील अशी अपेक्षा करण्यात आली. या कार्यक्रम ला राजुरा शहर व तालुक्यातून जवळ जवळ शंभर ते दीडशे धम्म उपासक उपसिका ची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरवात गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुध्द वंदना करण्यात आली. वरील पाहुण्याचे गुलदस्त देऊन स्वागत करण्यात आले. स्वागत गीत भीमराव खोब्रागडे सचिव राजुरा तालुका प्रास्ताविक, मेघा बोरकर अध्यक्ष राजुरा शहर यांनी केले, आभार प्रदर्शन किरण खैरे कोषाध्यक्ष राजुरा शहर यांनी केले आणि या कार्यक्रम चे उत्कृष्ट संचालन कु प्रतीक्षा वासनिक यांनी केले केले. या कार्यक्रमाला धर्मू. नगराळे, गौतम चौरे, भीमराव खोब्रागडे, गौतम देवगडे, मेघा बोरकर, किरण खैरे यांच्या मदतीने यशस्वी झाला शेवटी संस्थेच्या नियमा प्रमाणे सरणत्य घेऊन कार्यक्रम ची सांगता झाली.