ऋषी सहारे
संपादक
पोलीस स्टेशन देसाईगंज येथे दिनांक 17-06-2022 रोजी,फिर्यादी वैभव भोयर बँक मॅनेजर बँक ऑफ इंडिया शाखा देसाईगंज यांनी फिर्याद दिली की, दिनांक 16/06/22ते 17/06/22 चे रात्री दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरांनी ए. टी. म.मशीन फोडण्याचा प्रयत्न केला असून,त्यांनी ए. टी. म. रूमचे काच फोडून नुकसान केल्या बाबत फिर्याद दिल्याने, दिनांक 17/06/2022 रोजी अपराध क्रमांक 264/22 कलम 380,511,427 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला होता. सदर अज्ञात आरोपीचा,पोलीस स्टेशन परिसरात मुखबिर नेमून शोध घेतला असता.. सदर गुन्ह्यातील खालील आरोपींना अटक कार्यवाही करण्यात आली 1) राहुल बकाराम खरकाटे वय 28वर्षे 2) मुजशिर शब्बीर शेख वय 31 वर्षे 3)महेंद्रसिंग सुरजसिंग बावरी वय 46वर्षे सर्व रा.आंबेडकरवार्ड,देसाईगंज जि.गडचिरोली सदर आरोपीची अटक कार्यवाही, पोलीस अधीक्षक अंकित गोयल सो.अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख सो, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे सो.उपविभागीय पोलिस अधिकारी कुरखेडा, साहिल झरकर सो..यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक महेश मेश्राम सो..यांचे नेतृत्वाखाली,गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नी.ज्ञानेश्वर लांडे,पो.शी.श्रीकृष्ण जूवारे ,पो.शी निकलेश सोनवणे यांनी कामगिरी पार पाडली असल्याचे समजते.