पारशिवनी :- . तालुका तिल नेहरू युवा केंद्र व शहर विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांची १२१ वी जयंती निमिताने रक्तदान करूनकार्यक्रमाचे आयोजन नगर परिषद कन्हान येथे करण्यात आले
कन्हान येथे शहर विकास मंच व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय जनसंघ व शिक्षाविद्, चिन्तक चे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२१ व्या जयंती निमित्य भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – पिपरी नगर परिषद नवीन इमारत च्या सभागृहात येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी न प नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , नेहरु युवा केंद्र नागपुर चे उद्यविर सिंग , डॉ रवि गजभिए , मंच चे प्रमुख मार्गदर्शक श्री भरत सावळे यांच्या हस्ते डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . त्यानंतर लाईफ लाईन हाॅस्पीटल ब्लड बॅंक चे पथ का तिल डॉ अविनाश बाभरे , रवि गजभिए , पायल सागरे , प्रियंका ठोमरे , दिव्या हेडाऊ, वैभव लोहकरे , विशाल घोडेस्वार यांच्या सहकार्याने एकुण १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले असता रक्तदात्यांना टिफीन बाॅकस , फळ , निंबु शरबत व नमकीन पॅकिट वितरित करुन सत्कार करीत कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष रुषभ बावनकर , महेंद्र साबरे , सुरज वरखडे , प्रकाश कुर्वे , जेष्ठ पत्रकार कमलसिंह यादव , सुधिर भिवगडे , निलेश गाढवे , केतन भिवगडे , श्याम मस्के , प्रवीण हुड , अनुराग महल्ले , कृणाल राजपुत , हरीओम प्रकाश नारायण , सह आदि मंच पदाधिकार्यांनी , सदस्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .