वणी : परशुराम पोटे
येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री मारोतराव चोपणे ह्यांच्या ८७ व्या वाढदिवस निमित्ताने वणी, चिखलगाव येथील बाजीराव महाराज वृद्धाश्रमात धान्य, फळांचे वाटप तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
ह्याप्रसंगी प्रमुख पाहुणे बाबाराव खांदनकर, सुमित चोपणे, चंद्रपुर आणि डॉ शुभांगी चोपणे, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप मालेकर आणि मारोतराव चोपणे हे होते.
ह्या प्रसंगाचे औचित्य साधून जेष्ठ नागरिक आणि वृद्धाश्रमातील नागरिकांसाठी चंद्रपुर येथील डॉ.शुभांगी चोपणे ह्यांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तेथील आयोजित उदबोधन कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत बोन्डे ह्यांनि केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप पाटील मालेकर ह्यांनी मारोतराव चोपणे ह्यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे आभार श्री मारोतराव चोपणे ह्यानी केले. कार्यक्रमास अनेक जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
मारोतराव चोपणे ह्यांचा अल्प परिचय
मारोतराव भगवान चोपणे हे वणी तालुक्यातील प्रसिद्ध नाव ,त्यांचे वय 86 वर्षे असून ते आजही तेवढेच सक्रिय आहे जेव्हा ते निवृत्त झाले.ह्याचा जन्म 5/7/1936 ,सावर्ला,ता वणी येथें झाला.त्यांचे शिक्षण-11वी पर्यंत झाले असून ते 1957 -58 पर्यंत त्यांनी वणी तालुक्यात शिक्षक म्हणून काम केले. 1958 नंतर ग्रामसेवक म्हणून रुजू झाले. 1985-87 ह्या काळात ग्रामसेवक संघटनेचे उपाध्यक्ष ,1990-95 विस्तार अधिकारी म्हणून मारेगाव येथून निवृत्त झाले.
निवृत्तीनंतर त्यांनी 1995-90 मध्ये सावर्ला येथे बालाजी शिक्षण संस्थेची स्थापना करुन ते संस्थापक सचिव झाले. 2000-05 मध्ये सांवर्ला येथे ग्राम पंचायत सरपंच बनले,सावर्ला गावाला वणी तालुक्यातून आदर्श ग्राम म्हणून निवड व प्रथम पुरस्कार मिळवून दिला.
विवीध विषयावर वक्ते म्हणून त्याना अनेक ठिकाणी निमंत्रने येतात, साहित्य हा सुध्दा त्यांचा आवडता विषय. ते कवी,कथाकार ही आहेत.
अलीकडच्या काळातील सर्वात मोठा ग्रंथ,”आत्म साक्षात्कार “ह्या ग्रंथाची निर्मिती त्यानी केली असून त्यास राम शेवाळकर आणि डॉ भालचंद्र चोपणे ह्यांची प्रस्तावना आहे. त्यानी धार्मिक कविता संग्रह,सुलभ सत्यनारायन कथा,संत बाजीराव महाराज सत्संग मालिका,बाजीराव महाराज सचित्र जीवन गाथा अशी पुस्तके लिहीली असून आज 86 वर्षातही हे लिखाण, वाचन आणि भाषणे देतात.
2006 -10-तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष ,तंटामुक्त पुरस्कार मिळाला ,शासनातर्फे सत्कार झाला सदस्य-संत तुकडोजी साहित्य परिषदेचे सदस्य , गुरुदेव भूषण पुरस्कार ,ग्रामनाथ जीवन गौरव पुरस्कार, आमदार, खासदार, कुलगुरू,राम शेवाळकर इ अनेक लोकांनी त्यांचा कार्याचा सत्कार केला आहे.त्यांचे 86 वर्षाचे वय असूनही तरुणांना लाजवेल अशी कामे करतात.
त्यांच्या कार्यास शुभेच्छा !
प्रा सुरेश चोपणे, चंद्रपुर